PM Modi Papua New Guinea Visit: PM नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनीत दाखल, PM जेम्स मारापेंनी पाया पडून घेतले आशिर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 06:54 PM2023-05-21T18:54:37+5:302023-05-21T18:58:31+5:30
PM Modi In Papua New Guinea: पंतप्रधान नरेंद्र मोदी FIPIC शिखर परिषदेसाठी पापुआ न्यू गिनीमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
PM Modi Papua New Guinea Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) त्यांच्या सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पीएम मोदी रविवारी (21 मे) पापुआ न्यू गिनी (Papua New Guinea) येथे पोहोचले. FIPIC परिषदेत सहभागी होण्यासाठी PM मोदी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचताच पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी पंतप्रधान जेम्स मारापे (James Marape) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायाला स्पर्श करुन आशिर्वाद घेतला.
#WATCH | Prime Minister of Papua New Guinea James Marape seeks blessings of Prime Minister Narendra Modi upon latter's arrival in Papua New Guinea. pic.twitter.com/gteYoE9QOm
— ANI (@ANI) May 21, 2023
पापुआ न्यू गिनी येथील मोरेस्बी (जॅक्सन) आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान मोदींचे पारंपारिक पद्धतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने अनिवासी भारतीय उपस्थित होते. पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. पंतप्रधान 22 मे रोजी पापुआ न्यू गिनी येथे FIPIC शिखर परिषदेत सहभागी होतील.
#WATCH | People from the Indian diaspora welcome Prime Minister Narendra Modi as he arrives in Papua New Guinea. pic.twitter.com/O2DfVjSRyd
— ANI (@ANI) May 21, 2023
FIPIC ची स्थापना 2014 मध्ये पंतप्रधान मोदींच्या फिजी दौऱ्यादरम्यान झाली होती. आतापर्यंत कोणत्याही भारतीय पंतप्रधानाचा पापुआ न्यू गिनीला ही पहिलीच भेट आहे. पंतप्रधान मोदी जपानवरुन थेट पापुआ न्यू गिनीत दाखल झाले. यापूर्वी त्यांनी जपानमध्ये G-7 शिखर परिषदेत भाग घेतला आणि अनेक जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या.
14 देशांचे नेते सहभागी होणार
FIPIC परिषदेत 14 देशांचे नेते सहभागी होणार आहेत. कनेक्टिव्हिटी आणि इतर समस्यांमुळे हे सर्व क्वचितच एकत्र येतील. FIPIC मध्ये कुक आयलंड, फिजी, किरिबाटी, मार्शल बेटे, मायक्रोनेशिया, नाउरू, नियू, पलाऊ, पापुआ न्यू गिनी, सामोआ, सोलोमन बेटे, टोंगा, तुवालू आणि वानुआतु यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी मरापे यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर जनरल बॉब डेड यांचीही भेट घेतील.