देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होणार आणखी एका आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 08:32 AM2021-02-27T08:32:44+5:302021-02-27T08:35:38+5:30

Pm Narendra Modi : पुढील आठवड्यात पार पडणाऱ्या संमेलनात होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान

PM Modi to receive global energy and environment leadership award america | देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होणार आणखी एका आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान

देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होणार आणखी एका आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान

Next
ठळक मुद्देपुढील आठवड्यात पार पडणाऱ्या संमेलनात होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मानआंतरराष्ट्रीय ऊर्जा संमेलनाचं करण्यात आलं आहे आयोजन

पुढील आठव़ड्यात एका आंतरराष्ट्रीय ऊर्जा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना CERAWeek जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व या पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजक IHS Markit नं याबाबत माहिती दिली. या संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून वातावरण बदलांसाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे विशेष दूत जॉन केरी, बिल अँड मेलिंडा फाऊंडेशनचे सह-अध्यक्ष आणि ब्रेक थ्रू एनर्जीचे संस्थापक बिल गेट्स आणि सौदी अरामकोचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिन नासिर हे उपस्थित राहणार आहेत.
 
"आम्ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या भूमिकेविषयी पंतप्रधान मोदींच्या दृष्टिकोनाकडे पाहत आहोत. देश आणि जगाच्या आगामी काळातील ऊर्जेबाबत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत होत असलेल्या विकासात भारताच्या नेतृत्वाचा विस्तार करण्याच्या आपल्या बांधिलकीसाठी, आम्हाला त्यांना  CERAWeek  जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कारानं सन्मानित करण्यात आनंद होत आहे," असं IHS Makit चे उपाध्यक्ष आणि कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॅनिअल येर्गिन यांनी सांगितलं. 

"आर्थिक वाढ, गरीबी कमी करणं आणि नव्या उर्जेच्या भविष्याकडे लक्ष देताना भारत जागतिक उर्जा आणि पर्यावरणाच्या केंद्रस्थानी आला आहे. सार्वत्रिक उर्जा उपलब्धता सुनिश्चित करताना शाश्वत भविष्यासाठी हवामान बदलांच्याच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी त्याचं नेतृत्व महत्त्वपूर्ण आहे, असे ते म्हणाले. वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषद ऊर्जा उद्योगाचील दिग्गज, तज्ज्ञ, सरकारी अधिकारी आणि धोरणकर्ते, तंत्रज्ञानाचे नेते, आर्थिक आणि औद्योगिक समुदाय, तसंच ऊर्जा तंत्रज्ञान नवप्रवर्तकांचे एक संमेलन आहे.

 

 

Web Title: PM Modi to receive global energy and environment leadership award america

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.