इलॉन मस्क लवकरच भारतात येणार; पंतप्रधान मोदींशी चर्चेनंतर केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 17:50 IST2025-04-19T17:49:56+5:302025-04-19T17:50:15+5:30

PM Modi spoke Elon Musk: पीएम मोदींशी बोलणे सन्मानाची बाब असल्याची प्रतिक्रिया मस्क यांनी दिली.

PM Modi spoke Elon Musk: Elon Musk will come to India soon; Announcement made after discussions with Prime Minister Modi | इलॉन मस्क लवकरच भारतात येणार; पंतप्रधान मोदींशी चर्चेनंतर केली घोषणा

इलॉन मस्क लवकरच भारतात येणार; पंतप्रधान मोदींशी चर्चेनंतर केली घोषणा

PM Modi spoke Elon Musk: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी या वर्षीच्या अखेरीस भारत दौऱ्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदींशी बोलल्यानंतर त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर लिहिले की, 'मी भारतात येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.' 

काय म्हणाले इलॉन मस्क?
आपल्या पोस्टमध्ये इलॉन मस्क लिहितात, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान होता. या वर्षाच्या अखेरीस मी भारतात येण्यास उत्सुक आहे!" मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आणि मस्क यांच्यातील ही चर्चा तांत्रिक नवोपक्रम, अंतराळ संशोधन आणि द्विपक्षीय सहकार्यावर केंद्रित होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी(18 एप्रिल 2025) रोजी सांगितले की, त्यांनी अलिकडेच इलॉन मस्क यांच्याशी फोनवरून चर्चा केली, ज्यामध्ये दोघांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. दरम्यान, फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. या काळात त्यांची इलॉन मस्कशी भेट झाली. 

अमेरिका-चीन तणावादरम्यान भारतासोबत व्यावसायिक संवाद
अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव शिगेला पोहोचला असताना पंतप्रधान मोदी आणि मस्क यांच्यातील अलिकडचा फोन कॉल झाला आहे. अमेरिकेच्या शुल्कामुळे चीन प्रभावित झाला असून, तो भारतासोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत भारत-अमेरिका संबंध महत्त्वाचे बनले आहे.

भारतात नवीन गुंतवणुकीच्या संधी
इलॉन मस्कचा भारत दौरा हा केवळ एक सामान्य दौरा नाही तर त्यांच्या दोन प्रमुख कंपन्यांसाठी (टेस्ला आणि स्टारलिंक) मोठ्या व्यवसाय संधी आणू शकतो. टेस्ला आधीपासून स्वतःला भारतात स्थापित करण्याची तयारी करत आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 4000 चौरस फूट जागा भाड्याने घेतली आहे. 

Web Title: PM Modi spoke Elon Musk: Elon Musk will come to India soon; Announcement made after discussions with Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.