PM Modi US Visit: अमेरिकेतच होणार एच-१बी व्हिसाचे नूतनीकरण, पंतप्रधान मोदींची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 09:03 AM2023-06-25T09:03:05+5:302023-06-25T09:03:36+5:30
PM Modi US Visit: वॉशिंग्टन भारतीय वंशाच्या लोकांना एच-१बी व्हिसा नूतनीकरणासाठी अमेरिका सोडावे लागणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे जाहीर केले.
वॉशिंग्टन भारतीय वंशाच्या लोकांना एच-१बी व्हिसा नूतनीकरणासाठी अमेरिका सोडावे लागणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे जाहीर केले. येथील रोनाल्ड रिंगन बिल्डिंग आणि इंटरनॅशनल ट्रेड सेंटर येथे भारतीय समुदायाच्या सदस्यांच्या उत्साही मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. मोदी यांच्या या घोषणेनंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या या घोषणेचे स्वागत केले, आयटी व्यावसायिकांना याचा मोठा फायदा होणार असून, यावर्षी पथदर्शी प्रकल्प सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदी म्हणाले की, भारत- अमेरिका संबंधाचा एक नवीन आणि गौरवशाली प्रवास सुरू झाला आहे आणि जग अधिक चांगले बनवण्यासाठी दोन महान लोकशाही त्यांच्यातील वंध मजबूत करताना जग पाहत आहे. दोन्ही देशांमधील भागीदारीची पूर्ण क्षमता अजून लक्षात येणे बाकी आहे. या दोन्ही देशाचे दृढ संबंध "मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड' प्रयत्नांना घडविणारे तंत्रज्ञान: जो बायडेन यांचे प्रतिपादन चालना देणारे ठरतील. भारत लोकशाहीची जननी आहे आणि अमेरिका आधुनिक लोकशाहीचा चैम्पियन आहे आणि जग दोन महान लोकशाहीतील संबंध मजबूत होताना पाहत आहे. अमेरिका-अहमदाबाद आणि बंगळुरू येथे नवीन वाणिज्य दूतावासही उघडत आहे, असे मोदी म्हणाले, एक अनुभवी नेते म्हणून बायडेन यांचे मोदी यांनी कौतुक केले, अमेरिका दौरा संपताच मोटीनी द्वीट केले की. अतिशय खास अमेरिका भेट, जिथे मला भारत-अमेरिका मैत्रीला गती देण्याच्या उद्देशाने अनेक कार्यक्रमात भाग घेता आला. (वृत्तसंस्था)
भारत-अमेरिका विकसित करणार जागतिक बदल
वॉशिंगटन: जगभरातील लोकांचे जीवन बदलू शकेल, असे नवे तंत्रज्ञान व डिझाइन विकसित करण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्रितपणे काम करतील, अशी ग्वाही अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यानी दिली आहे. द्विपक्षीय तंत्रज्ञानात अडथळे निर्माण करणाऱ्या गतिरोधकांवर चर्चा करण्याच्या वाचतीत मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोटी ठाम आहोत, असेही चावडेन यानी सागितले. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी हेसुद्धा सहभाही झाले होते.
बायडेन यानी गुरुवारी व्हॉईट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका हाऊसमध्ये मोदी याच्यासोबत व्यापक चर्चा केली होती. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, जगभरातील लोकांच्या जीवनात बदल घडविण्याची क्षमता असलेले नवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आम्ही एकत्रित काम करीत आहोत. हे काम शक्य करण्यासाठी आम्ही सार्वजनिक भागीदारांना पुढे करीत आहोत.
मोदी ठरले पहिलेच नेते
अमेरिका दौयादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतिहास घडविला. काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला दोनदा संबोधित करणारे ते पहिले भारतीय नेते ठरले आहेत. त्यानी तरुण उद्योजकांना संबोधित केले आणि प्रमुख सीईओची भेट घेतली.
जग तुमचा भारत बघत आहे.....
भारत-अमेरिका संबंधाबद्दल मोदी म्हणाले की, आम्ही एकत्र मिळून केवळ धोरणे आणि करार तयार करत नाहीत. आम्ही जीवनमान, स्वप्ने आणि भविष्याला आकार देत आहोत, दोन्ही देशांमधील संबंध केवळ वाणिज्य आणि व्यापारावर आधारित नव्हे, तर भावनिकदेखील आहेत, भारताची ताकद जगाच्या विकासाला कशी नवी दिशा देत आहे, हे पाहून तुम्हाला अभिमान वाटेल. जग तुमचा भारत बघत आहे. यावेळी उपस्थितानी मोदी मोदीच्या घोषणा दिल्या.
भारताला चीनच्या तुल्यबळ उभे करण्याचा उद्देश नव्हता - व्हाइट हाउस
नरेंद्र मोदी यांच्या दौयाचा उद्देश भारताला चीनच्या तुल्यबळ उभे करणे हा नाही, तर जगातील दोन सर्वांत मोठ्या लोकशाही देशामधील संरक्षण सहकार्यासह संबंध अधिक दृढ करणे हा आहे. असे मत व्हाइट हाउसच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. व्हाइट हाउसमधील समन्वयक जॉन किवी म्हणाले की चीन हा भारतासमोरही आव्हाने उभे करत आहे. ही आव्हाने केवळ त्याच्या सीमेपुरती मर्यादित नाहीत, तर त्या प्रदेशात व्यापक स्तरावर आहेत.
पंतप्रधानांच्या ऐतिहासिक इजिप्त दौऱ्याला प्रारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन R दिवसांच्या इजिप्त दौन्यासाठी शनिवारी कैरो येथे आगमन झाले. दोन्ही देशांची रणनीतिक भागीदारी वाढविण्यासाठी या दौऱ्यात ते इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल- सिसी यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.
राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांच्या निमंत्रणावरून मोदी है इजिप्तच्या दौऱ्यावर आले आहेत. इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मडबौली यांनी त्यांचे कैरो विमानतळावर स्वागत केले. त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला. ही भारतीय पंतप्रधानांची २६ वर्षांतील पहिली इजिप्त भेट आहे, मोदी हे रविवारी अल सिसी यांना भेटणार आहेत. मडबौली यांच्या नेतृत्वाखालील गोलमेज परिषदेलाही ते हजेरी लावतील. इजिप्तचे मुख्य मुफ्ती डॉ. शावकी इब्राहिम अब्देल करीम अल्लम यांचीही ते भेट घेणार आहेत.
अल हकीम मशिदीला भेट देणार
मोदी हे रविवारी २१ व्या शतकातील अल-हकीम मशिदीला भेट देणार आहेत. या मशिदीया दाउदी बोहरा समाजाच्या मदतीने जीर्णोद्धार करण्यात आला आहे. भारतातील दाउदी बोहरा समुदाय फातिमा यशापासून निर्माण झालेला असून, १९७० नंतर समुदायाने या मशिदीचा जीर्णोद्धार केला,