video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबुधाबीमध्ये भव्य हिंदू मंदिराचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 08:05 PM2024-02-14T20:05:49+5:302024-02-14T20:07:38+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबुधाबीतील भव्य स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
PM Modin in UAE: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या UAE दौऱ्यावर असून, त्यांनी बुधवारी(दि.14) अबुधाबी येथील भव्य-दिव्य अशा श्री बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) मंदिराचे उद्घाटन केले. आखाती देशातील हे पहिले हिंदूमंदिर आहे. मंदिर परिसरात दाखल होताच महंत स्वामी महाराज यांच्यासह अनेक संतांनी पीएम मोदींचे स्वागत केले.
#WATCH | Actor Akshay Kumar arrives at Abu Dhabi BAPS temple to be inaugurated by PM Modi today pic.twitter.com/pX3PsWmgqI
— ANI (@ANI) February 14, 2024
यावेळी पंतप्रधान मोदींनीही महंत स्वामी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर पीएम मोदींच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर पीएम मोदी आरतीमध्ये सहभागी झाले. तसेच, त्यांनी स्वामी महाराज यांच्यासोबत संपूर्ण मंदिराची पाहणी केली. विशेष म्हणजे, 2018 मध्ये मोदींच्याच हस्ते मंदिराची पायाभरणी झाली होती.
#WATCH | PM Modi performs rituals at BAPS Hindu temple in Abu Dhabi, UAE pic.twitter.com/MTdet4noci
— ANI (@ANI) February 14, 2024
700 कोटी रुपये खर्चून बांधले BAPS हिंदू मंदिर
अबुधाबीचे BAPS स्वामीनारायण मंदिर 108 फूट उंच, 262 फूट लांब आणि 180 फूट रुंद आहे. ही तयार करण्यासाठी 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मंदिराच्या बांधकामात केवळ चुनखडी आणि संगमरवरी वापरण्यात आला आहे. मंदिराच्या बांधकामासाठी 700 कंटेनरमध्ये 20,000 टन पेक्षा जास्त दगड आणि संगमरवरी अबुधाबीला आणण्यात आले होते.
#WATCH | Prime Minister Narendra Modi at the Bochasanwasi Akshar Purushottam Swaminarayan Sanstha (BAPS) Mandir in Abu Dhabi. pic.twitter.com/eI7yLW2RPE
— ANI (@ANI) February 14, 2024
27 एकर जागेवर बांधलेले मंदिर
ऑगस्ट 2015 मध्ये UAE सरकारने अबू धाबीमध्ये मंदिर बांधण्यासाठी 13.5 एकर जमीन भेट दिली. त्यानंतर 2019 मध्ये मंदिरासाठी अतिरिक्त 13.5 एकर जमीन देण्यात आली. अशाप्रकारे या मंदिराचा परिसर 27 एकरात पसरलेला आहे. हे मंदिर आखाती देशातील पहिले हिंदू मंदिर आहे. या मंदिरामुळे या परिसरातील पर्यटनालाही चालना मिळेल. भारतसह जगभरातील पर्यटक येथे येतील.