देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन करण्याचे लक्ष्य - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 09:34 PM2019-10-29T21:34:12+5:302019-10-29T21:47:11+5:30
सौदी अरेबियातील 'दावोस इन द डेजर्ट' संमेलनात नरेंद्र मोदींच्या भाषण
रियाध : सौदी अरेबियातील रियाधमध्ये 'दावोस इन द डेजर्ट' संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असून त्यांनी गुंतवणूक विषयी आपले विचार मांडले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था येत्या पाच वर्षात 5 ट्रिलियन करण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे सांगितले. तसेच, भारतातील वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक आवश्यक असून ऊर्जेचा वापर आणि ऊर्जेची बचत दोन्ही महत्त्वाचे असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
#WATCH Saudi Arabia: Prime Minister Narendra Modi delivers keynote address at Future Investment Initiative (FII) in Riyadh. https://t.co/Jsdwtm6Htn
— ANI (@ANI) October 29, 2019
नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही ठळक मुद्दे...
- सौदी अरेबियामध्ये आल्यावर खूप ऊर्जा मिळाल्यासारखे वाटते
- भारतीयांच्या शुभेच्छा घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे.
- भारत आणि सौदी अरेबियातील संबंध शतकांपासून सुरू आहेत.
- भारत आज जगातील तिसरा मोठा startups ecosystem बनला आहे.
- आमचे अनेक startups जागतिक स्तरावर गुंतवणूक करत आहेत.
- भारतात संशोधन आणि निर्मितीपासून तंत्रज्ञान उद्योजकतेचा एका इको-सिस्टिम तयार होत आह.
- भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
- भारतात गेल्या पाच वर्षांत आम्ही अनेक महत्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत.
- गेल्या पाच वर्षात 286 बिलियन डॉलर एफडीए झाला आहे.
- वन नेशन वन पॉवर ग्रीड, गॅस ग्रीड, ऑप्टिकल फायबर नेटवर्कसाठी भारत प्रयत्नशील आहे.
-आम्ही 'इज ऑफ डुईंग बिझनेस'मध्ये नव्हे तर 'इस ऑफ लिव्हिंग'मध्येही सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत.
-आज भारतात प्रत्येक नागरिकाजवळ युनिक आयडी, मोबाईल फोन आणि बँक अकाऊंट आहे
- भारतातील विकासाची गती आणखी वाढेल.
- विकासाशी संलग्न असलेला प्रत्येक निर्णय आम्ही घेत आहोत.
- वसुधैव कुटुंबकम संकल्पनेवर आमचा विश्वास आहे.
- सक्षम भारताने कधी कुणावरही बळाचा वापर केला नाही.
-भारताने आपल्याकडील साधने वाटण्याचे काम केले आहे.