चंद्राच्या ज्या भूभागावर चंद्रयान-3 उतरले...; ग्रीसमधून PM मोदींचा जगाला खास संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 03:43 PM2023-08-25T15:43:00+5:302023-08-25T15:44:17+5:30

ग्रीसमध्ये मोदींचं जबरदस्त स्वागत...

PM Modi's special message to the world from Greece says chandrayaan 3 success for humankind | चंद्राच्या ज्या भूभागावर चंद्रयान-3 उतरले...; ग्रीसमधून PM मोदींचा जगाला खास संदेश

चंद्राच्या ज्या भूभागावर चंद्रयान-3 उतरले...; ग्रीसमधून PM मोदींचा जगाला खास संदेश

googlenewsNext

चंद्रयान-3 चे यश हे केवळ भारत अथवा भारतीय वैज्ञानिकांचेच यश नाही, तर हे संपूर्ण मानव जातीचे यश आहे.  संपूर्ण मानव जातीच्या भविष्यासाठी विज्ञानाचे अशा पद्धतीचे धाडस आणि यश फार महत्वाचे आहे. यातही चंद्रयान-3 चंद्राच्या ज्या पृष्ठभागावर उतरले आहे, मला वाटते की, यातून जे परिणाम बाहेर येतील ते विज्ञान जगत आणि संपूर्ण मानवजातीला चांद्रासंदर्भातील जिज्ञासा आणि भविष्यातील योजनांसाठी उयुक्त ठरतील, असे पंतप्रधा नरेद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते सध्या ग्रीस दौऱ्यावर आहेत. एथेन्समध्ये ग्रीक राष्ट्रपती कॅटरीना एन. यांनी चंद्रयान-3 च्या यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. यानंतर मोदी बोलत होते. 

ग्रीसमधून थेट इस्रोत जाणार पीएम मोदी -
दक्षिण आफ्रिकेत 15वे ब्रिक्स शिखर सम्मेलनात भाग घेतल्यानंतर, पंतप्रधान मोदी ग्रीसमधील एथेन्स येथे पोहोचले आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, ते 26 ऑगस्ट रोजी थेट बेंगळुरू येथे पोहोचून, चंद्रयान-3 च्या यशाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेऊन त्यांचे अभिनंद करू शकतात. यानंतर ते दिल्लीला जातील. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश आणि चंद्रावर उतरणारा चौथा देश बनला आहे. दक्षिण आफ्रिकेतून चांद्रयान-3 चे लँडिंग लाईव्ह पाहणारे पंतप्रधान मोदी यांनी मिशन यशस्वी  होताच इस्रो प्रमुखांशी फोनवर संवाद साधला होता. 

ग्रीसमध्ये मोदींचं जबरदस्त स्वागत -
ग्रीसमध्ये पोहोचताच ग्रीसचे परराष्ट्र मंत्री जॉर्ज गेरापेटेरिटिस यांनी विमानतळावर भव्य स्वागत केले. जवळपास ४ दशकांच्या प्रदीर्घ काळानंतर भारतीय पंतप्रधान ग्रीसला भेट देत आहेत. ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या खास निमंत्रणावरून नरेंद्र मोदी अथेन्सला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक विमानतळावर दाखल झाले होते.

नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर हजारो लोकांनी ढोलताशांच्या गजरात स्वागत केले. नरेंद्र मोदींनीही तिथल्या लोकांची मोठ्या प्रेमाने भेट घेतली. ते लहान मुलांशी संवाद साधतानाही दिसले. ते अथेन्समधील हॉटेल ग्रॅन्डे ब्रेटाग्ने येथे थांबणार आहेत.

Web Title: PM Modi's special message to the world from Greece says chandrayaan 3 success for humankind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.