PM मोदी अमेरिकेत पोहोचले, विमानतळावर भारतीयांना भेटले; जल्लोषात स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 11:44 PM2023-06-20T23:44:34+5:302023-06-20T23:46:13+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि प्रथम महिला जिल बायडन यांच्या निमंत्रणावरुन मोदींचा हा अमेरिका दौरा होत आहे
पंतप्रधान नरेद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून ते न्यूयॉर्क विमानतळावर पोहोचले. मोदींच्या दौऱ्याची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या भारतीय प्रवाशांनी विमानतळावरच मोदी-मोदी घोषणाबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. मोदींचा तीन दिवसीय अमेरिका दौरा असून २१ ते २४ जूनपर्यंत ते अमेरिकेत असणार आहेत. तेथून ते इजिप्त दौऱ्यावर जात आहेत. मोदींच्या अमेरिका दौऱ्यात ते येथील संसदेला संबोधित करणार आहेत. तर, राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या घरीही पाहुणचार घेणार आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि प्रथम महिला जिल बायडन यांच्या निमंत्रणावरुन मोदींचा हा अमेरिका दौरा होत आहे. या दौऱ्यात भारत आणि अमेरिका यांच्या संरक्षणविषयक करार होणार असल्याचे समजते.
भारतीय वेळेनुसार नरेंद्र मोदी रात्री १० वाजताच्या सुमारास अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे पोहोचले. यावेळी, अमेरिकेकडून विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं. तर, विमानतळाहून त्यांच्या इच्छित ठिकाणी जात असताना भारतीय नागरिकांनी तिरंगा ध्वज फडकावत मोदी-मोदी असा नारा दिला. यावेळी, मोदींनी भारतीय नागरिकांना भेट घेऊन, हस्तांदोलन करत त्यांच्याशी संवादही साधला.
#WATCH प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिका की ऐतिहासिक राजकीय यात्रा पर न्यूयॉर्क पहुंचे।
— ANI_HindiNews (@AHindinews) June 20, 2023
भारतीय समुदाय के लोगों ने पीएम मोदी का न्यूयॉर्क में जोरदार स्वागत किया। pic.twitter.com/K4CbohJtDo
दरम्यान, न्यूयॉर्क अमेरिकेतील आपल्या यात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सीईओ, नोबेल पुरस्कार विजेते, अर्थशास्त्रज्ञ, कलाकार, वैज्ञानिक, उद्योजक, विद्वान, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या भेटी घेणार आहेत. तर, २१ जून या जागतिक योग दिनी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात योग दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
पीएम न्यूयॉर्क की अपनी यात्रा के दौरान सीईओ, नोबेल पुरस्कार विजेताओं, अर्थशास्त्रियों, कलाकारों, वैज्ञानिकों, विद्वानों, उद्यमियों, शिक्षाविदों, स्वास्थ्य क्षेत्र के विशेषज्ञों से मुलाकात करेंगे। प्रधानमंत्री 21 जून को संयुक्त राष्ट्र मुख्यालय में योग दिवस समारोह में शामिल होंगे।
— ANI_HindiNews (@AHindinews) June 20, 2023