मोदींनी इम्रान खान यांना टाळलं; एकाच परिषदेत असूनही संवाद नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 10:21 PM2019-06-13T22:21:06+5:302019-06-13T22:25:27+5:30
मोदींनी खान यांच्याकडे पाहणंदेखील टाळलं
बिश्केक: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिश्केकमधील एससीओच्या परिषदेदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पूर्णपणे टाळलं. मोदी आणि इम्रान खान एकाच डिनर टेबलवर होते. मात्र मोदींनी खान यांच्याशी संवाद साधला नाही. मोदींनी त्यांच्याकडे पाहणंदेखील टाळलं. एबीपी न्यूजनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. त्याआधी मोदींनी या परिषदेला जाण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करणंदेखील टाळलं. मोदींनी बिश्केकमधील परिषदेला जाताना पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करावा, असं पाकिस्तान सरकारनं म्हटलं होतं. मात्र मोदींनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केला नाही.
Sources: There was no meeting between Prime Minister Narendra Modi and Pakistan PM Imran Khan. No exchange of pleasantries between the two leaders. #SCOSummit (file pics) pic.twitter.com/wMvoy19LgY
— ANI (@ANI) June 13, 2019
आठ देशांचा समावेश असलेल्या एससीओ परिषदेला आजपासून किरगिझस्तानमधल्या बिश्केकमध्ये सुरुवात झाली. या परिषदेदरम्यान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबत चर्चा केली. मात्र त्यांनी इम्रान खान यांच्यासोबत संवाद साधणं टाळलं. मोदींनी खान यांच्याकडे पाहिलंदेखील नाही. फेब्रुवारी महिन्यात पुलवामात मोठा दहशतवाद झाला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले.
एससीओ परिषदेदरम्यान मोदींनी चीनच्या अध्यक्षांशी संवाद साधताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं मोदी आणि जिनपिंग यांनी म्हटलं. दक्षिण आशिया दहशतवादमुक्त व्हावा, असं भारताला वाटतं. मात्र त्यासाठी पाकिस्तानकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याचं मोदी जिनपिंग यांना म्हणाले.