PM नरेंद्र मोदींची 'अल-हकीम' मशिदीला भेट; 4000 शहीद भारतीय सैनिकांना वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 03:29 PM2023-06-25T15:29:07+5:302023-06-25T15:41:40+5:30
PM Narendra Modi Egypt Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इजिप्त दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध 'अल हकीम' मशिदीला भेट दिली.
PM Narendra Modi Egypt Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेनंतर इजिप्तच्या दौऱ्यावर आहेत. इजिप्तमध्ये शनिवारी मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले. इजिप्त दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी(आज) पंतप्रधान मोदींनी प्रसिद्ध 'अल हकीम'मशिदीला भेट दिली. यावेळी दाऊदी बोहरा समाजाच्या लोकांनी पंतप्रधानांचे जोरदार स्वागत केले.
#WATCH | Prime Minister Narendra Modi visits Al-Hakim Mosque in Cairo, Egypt pic.twitter.com/lziLcHrXVz
— ANI (@ANI) June 25, 2023
शहिदांना वाहिली श्रद्धांजली
यानंतर पंतप्रधान मोदींनी हेलिओपोलिस कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह येथील युद्ध स्मारकाला भेट दिली आणि पहिल्या महायुद्धात बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. पहिल्या महायुद्धात इजिप्त आणि पॅलेस्टाईनमध्ये शहीद झालेल्या 4000 भारतीय सैनिकांचे स्मारक म्हणून हे स्मारक ओळखले जाते.
Prime Minister Narendra Modi visits Heliopolis War Cemetery in Egypt's Cairo and pays tribute to Indian soldiers who made supreme sacrifices during the First World War. pic.twitter.com/YRmCUtLGGd
— ANI (@ANI) June 25, 2023
अल हकीम मशिदीचे भारताशी विशेष नाते
11व्या शतकातील ऐतिहासिक अल-हकीम मशिदीचा भारताशीही विशेष संबंध आहे. भारताने या मशिदीच्या पुनरुज्जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट असलेल्या या मशिदीचे नूतनीकरण बोहरा समाजाने केले. दाऊदी बोहरा समाजाचे 52 वे धर्मगुरू सय्यद मोहम्मद बुरहानुद्दीन यांनी त्याची जबाबदारी घेतली. बुरहानुद्दीन यांचे भारताशी संबंध असून त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
#WATCH | Cairo, Egypt: Shujauddin Shabbir Tambawala, a member of the Bohra community part of the Indian diaspora, who was present at Al-Hakim Mosque when PM Modi visited there today, says, "It is a historic day for us as PM Modi came here today and interacted with us. He also… pic.twitter.com/snYhzt9lWA
— ANI (@ANI) June 25, 2023
बोहरा समाजाचे सदस्य पंतप्रधानांच्या भेटीने खूश
भारतीय वंशाच्या बोहरा समुदायाचे सदस्य शुजाउद्दीन शब्बीर तांबावाला म्हणाले की, आजचा दिवस आमच्यासाठी ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अल-हकीम मशिदीत येथे आले आणि आम्हाला भेटले. त्यांनी आमच्या बोहरा समाजाचीही विचारपूस केली आणि आमच्याशी संवादही साधला. ते आमच्या कुटुंबातील सहस्य आहेत, असे आम्हाला वाटले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.