अयोध्या- जनकपूर बससेवा सुरु; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 12:32 PM2018-05-11T12:32:41+5:302018-05-11T12:32:41+5:30
धार्मिक पर्यटनासाठी रामायण सर्किट अंतर्गत अयोध्या, नंदिग्राम, शृंगवरपूर आणि चित्रकूटचा विकास केला जाईल असे सूत्रांनी सांगितले आहे.
जनकपूर- भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमध्ये एकत्रित रामायण सर्किट तयार करु आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये जनकपूर येथे बोलताना दिले. पंतप्रधानांनी नेपाळमधील जनकपूर ते भारतातील अयोध्या यांना जोडणाऱ्या बससेवेला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचे उद्घाटनही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. सकाळी 10.15 वाजल्यापासून त्यांच्या नेपाळ दौऱ्याचा प्रारंभ झाला. या दौऱ्यात सर्वात प्रथम ते जनकपूर येथे गेले असून जानकी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहाण्यासाठी जनकपूरवासियांनी मोठी गर्दी केली होती.
I am glad to be here in Janakpur. I am here to pay respects to King Janak and Mata Janaki. I thank the PM of Nepal Shri Oli for accompanying me during this visit to Janakpur : PM @narendramodipic.twitter.com/7eY5wjEMOZ
— BJP (@BJP4India) May 11, 2018
दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी काठमांडू येथे जाणार असून तेथए नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची ते भेट घेणार आहेत तसेच ते उपराष्ट्रपती नंदा बहादूर पन यांचीही भेट घेतील. त्यानंतर संध्याकाळी नेपाळचे पंतप्रधान के. पी ओली यांच्याबरोबर शिष्टमंडळासह विविध विषयांवर चर्चा करतील. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान अनेक करारांवर स्वाक्षरी करतील अशी माहिती देण्यात येत आहे. तसेच 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेल्या अरुण 3 प्रकल्पाचे ते उद्घाटन करतीलय या प्रकल्पातून 900 मेगावॅट इतकी ऊर्जा निर्माण होणार आहे.
PM Narendra Modi & Nepalese PM KP Sharma Oli flag off the Indo-Nepal bus service from #Nepal's Janakpur to Uttar Pradesh's Ayodhya. pic.twitter.com/4cxRf64cOM
— ANI (@ANI) May 11, 2018
के. पी. शर्मा ओली गेल्याच महिन्यात भारतात आले होते. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नेपाळच्या दौऱ्यावर जात आहेत. नेबरहूड फर्स्ट या भारत सरकारच्या धोरणाला अनुसरूनच हा आपला दौरा होत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. आज नेपाळ लोकशाहीच्या मदतीने आणि वेगवान आर्थिक प्रगतीच्या साहाय्याने नव्या युगात प्रवेश करत आहे. नेपाळ सरकारच्या समृद्ध नेपाळ आणि सुखी नेपाळ या धोरणाला सहाय्य करण्यासाठी भारत बांधील आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.
धार्मिक पर्यटनासाठी रामायण सर्किट अंतर्गत अयोध्या, नंदिग्राम, शृंगवरपूर आणि चित्रकूटचा विकास केला जाईल असे सूत्रांनी सांगितले आहे.