PM Narendra Modi: PM मोदींचा जगभरात डंका, पापुआ न्यू गिनी आणि फिजीने सर्वोच्च पुरस्काराने केले सन्मानित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 01:35 PM2023-05-22T13:35:44+5:302023-05-22T13:37:34+5:30
PM Narendra Modi: फिजीने 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी', तर पापुआ न्यू गिनीने 'द ग्रँड कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे.
PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी आधी जपान दौरा झाल्यानंतर ते रविवारी (21 मे) रोजी पापुआ न्यू गिनी (Papua New Guinea) या देशात दाखल झाले. दरम्यान, यावेळी जगभरात पंतप्रधान मोदींचा डंका वाजत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
Grateful to the people and Government of Fiji for conferring the Companion of the Order of Fiji on me. I thank PM @slrabuka for presenting the award. It is an honour for the people of India and a recognition of the strong ties between India and Fiji. pic.twitter.com/rhUPrE0Nvu
— Narendra Modi (@narendramodi) May 22, 2023
अनेक देशांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे. यात पापुआ न्यू गिनी आणि फिजी या देशांची भर पडली आहे. या दोन्ही देशांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या देशाचा सर्वोच्च सन्मान दिला आहे. फिजीने पंतप्रधान मोदींना 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी' हा सन्मान दिला आहे, तर यजमान देश पापुआ न्यू गिनीने पंतप्रधान मोदींना 'द ग्रँड कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू' या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले आहे.
Humbled by the gesture of Papua New Guinea of conferring me with the Companion of the Order of Logohu. Gratitude to Governor General Sir Bob Dadae for presenting the award. This is a great recognition of India and the accomplishments of our people. pic.twitter.com/VDhqTJK6Ra
— Narendra Modi (@narendramodi) May 22, 2023
जपानमध्ये जी-7 शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी थेट पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले. यावेळी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी स्वतः पीएम मोदींचे विमानतळावर स्वागत केले. त्यांनी मोदींच्या पायाला स्पर्ष करुन आशिर्वादही घेतला. दरम्यान, आज त्यांनी तिसर्या इंडो-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन (FIPIC) शिखर परिषदेत जेम्स मारापे आणि मोदींनी संयुक्तपणे यजमानपद स्विकारले.
चीनला प्रत्युत्तर देण्याची रणनीती
पंतप्रधान मोदी यांनी पीएम जेम्स मारापे यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. 2014 मध्ये मोदींच्या फिजी दौऱ्यादरम्यान FIPIC लाँच करण्यात आले होते. ही शिखर परिषद अशा वेळी होत आहे, जेव्हा चीन या भागात आपला लष्करी आणि राजनैतिक प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'तुमचा विकास भागीदार असल्याचा भारताला अभिमान आहे.
मानवतावादी मदत असो किंवा तुमचा विकास असो, तुम्ही भारताला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहू शकता आणि त्यावर विश्वास ठेवू शकता. आम्ही आमचा अनुभव आणि क्षमता तुमच्यासोबत कोणत्याही संकोचशिवाय सामायिक करण्यास तयार आहोत. डिजिटल तंत्रज्ञान असो वा अवकाश तंत्रज्ञान, आरोग्य सुरक्षा असो वा अन्न सुरक्षा, हवामान बदल असो की इतर, आम्ही सर्व प्रकारे तुमच्यासोबत आहोत.