PM Narendra Modi Sydney: ऑस्ट्रेलियात पीएम मोदींच्या पारंपरिक स्वागताची चर्चा, काय आहे स्मोकिंग सेरेमनी? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 05:17 PM2023-05-23T17:17:37+5:302023-05-23T17:18:40+5:30
PM Narendra Modi Sydney: पीएम मोदींनी ऑस्ट्रेलियात 20 हजार भारतीयांना संबोधित केले. यावेळी मोदींचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
PM Narendra Modi in Sydney Australia: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी ऑस्ट्रेलियाने कोणतीही कसर सोडली नाही. पीएम मोदींनी सिडनीच्या कुडोस बँक एरिना येथे 20 हजारांहून अधिक भारतीयांना संबोधित केले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मोदींचे जोरदार स्वागत केले.
#WATCH | Prime Minister Narendra Modi welcomed at Qudos Bank Arena in Sydney amid Vedic chanting and other traditional ways at Qudos Bank Arena in Sydney.
— ANI (@ANI) May 23, 2023
Australian Prime Minister Anthony Albanese is also with PM Modi. pic.twitter.com/onjx7Yq2f1
सिडनीच्या या स्टेडियममध्ये भाषणापूर्वी वैदिक मंत्रोच्चार आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या पारंपारिक स्वागताने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यावेळी 'स्मोकिंग सेरेमनी'ने पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यात आले. स्मोकिंग सेरेमनीदरम्यान पीएम मोदी आणि पीएम अल्बानीज यांनी विशेष वनस्पतींच्या पानांच्या धुरामध्ये श्वास घेतला.
#WATCH | Prime Minister Narendra Modi welcomed at Qudos Bank Arena in Sydney in a traditional manner.
— ANI (@ANI) May 23, 2023
PM Modi will address the members of the Indian diaspora at a community event shortly. Australian Prime Minister Anthony Albanese is also with him. pic.twitter.com/fPvtZoBpep
स्मोकिंग सेरेमनी म्हणजे काय?
ऑस्ट्रेलियातील स्मोकिंग सेरेमनी ही एक पारंपारिक प्रथा आहे, ज्यामध्ये स्थानिक वनस्पतींच्या पानांच्या धूरात श्वास घेतला जातो. या वनौषधींच्या धुराने आध्यात्मिक आणि शारीरिक शुद्धी होते, अशी श्रद्धा आहे. असे मानले जाते की, स्मोकिंग सेरेमनीमुळे वाईट आत्म्या दूर जातात. पूर्वी बाळाच्या जन्माच्या वेळी किंवा दीक्षा आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये हे केले जायचे. आता परदेशी पाहुण्यांच्या स्वागतादरम्यानही स्मोकिंग सेरेमनी केली जाते. हा सोहळा आदिवासी समाजातील सदस्य करतात.