लंडन पोलिसांना म्हणाल्या पॅलेस्टाईन समर्थक, आता गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची हकालपट्टी; ऋषी सुनक यांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 02:58 PM2023-11-13T14:58:41+5:302023-11-13T15:10:45+5:30
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांना पदावरुन हटवले आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांना पदावरुन हटवले आहे. सुएला ब्रेव्हरमन यांनी त्यांच्या एका लेखात लंडन पोलिसांवर पॅलेस्टाईनशी संबंधित आरोप केले होते, त्यानंतर त्या वादात सापडल्या होत्या. यानंतर पीएम ऋषी सुनक यांच्यावर मंत्र्यांना बडतर्फ करण्यासाठी दबाव होता.
भयावह! "मला सोडा, उद्या माझी शाळा आहे..."; दहशतवाद्यासमोर मुलीची विनवणी, पण त्याने...
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांना पदावरुन हटवले आहे. सुएला ब्रेव्हरमन यांनी त्यांच्या एका लेखात लंडन पोलिसांवर पॅलेस्टाईनशी संबंधित आरोप केले होते, त्यानंतर त्या वादात सापडल्या होत्या. यानंतर पीएम ऋषी सुनक यांच्यावर मंत्र्यांना बडतर्फ करण्यासाठी दबाव होता.
सुएला ब्रेव्हरमन यांच्या लेखामुळे मोठा वाद सुरू झाला होता. दरम्यान, आता त्यांना पदावरुन हटवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी लंडनमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने आयोजित करण्यात आली होते, यात पोलिसांनी निदर्शने ज्या पद्धतीने थांबवले त्याबद्दल मंत्री सुएला ब्रेव्हरमन संतापल्या होत्या. त्यांनी एका लेखात पॅलेस्टाईन समर्थक निदर्शने दडपण्याच्या लंडन पोलिसांच्या पद्धतींवर टीका करताना ऋषी सुनक यांना लक्ष्य केले होते.
या लेखाने उजव्या विचारसरणीच्या निदर्शकांना लंडनच्या रस्त्यावर उतरण्यास प्रोत्साहित केले. वाढता विरोध पाहून सुनक सुएला यांच्यावर कारवाईसाठी वाढता दबाव आणत होते आणि त्याच दरम्यान, मंत्रिमंडळ फेरबदलात सुएला यांना बडतर्फ केल्याची बातमी समोर आली आहे.
सुएला ब्रेव्हरमन यांच्या आणखी एका विधानाने खळबळ उडवून दिली. यामध्ये त्यांनी म्हटले की, ब्रिटीश शहरांमध्ये फूटपाथवर राहणारे लोक तेथे त्यांच्या स्वतःच्या इच्छेने राहतात आणि ही त्यांची जीवनशैली निवड आहे. त्यांच्या ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले होते, 'ब्रिटनचे लोक दयाळू आहेत. जे खरोखर बेघर आहेत त्यांना आम्ही नेहमीच आधार देऊ. परंतु आम्ही आमचे रस्ते लोकांच्या तंबूंच्या पंक्तींनी ताब्यात घेऊ देणार नाही, ज्यापैकी बरेच लोक परदेशातून आले आहेत. हे लोक त्यांच्या जीवनशैलीचा पर्याय म्हणून रस्त्यावर राहतात.