“७५ वर्षांपासून कटोरा घेऊन फिरतोय, मित्र देशही भिकारी समजायला लागलेत”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 02:32 PM2022-09-16T14:32:54+5:302022-09-16T14:33:13+5:30

पाकिस्तानच्या पंतप्रधानांची स्पष्टोक्ती.

pm shehbaz sharif says even friendly nations started looking at pakistan as beggars 75 years we are asking for money | “७५ वर्षांपासून कटोरा घेऊन फिरतोय, मित्र देशही भिकारी समजायला लागलेत”

“७५ वर्षांपासून कटोरा घेऊन फिरतोय, मित्र देशही भिकारी समजायला लागलेत”

googlenewsNext

सध्या पाकिस्तानचीअर्थव्यवस्था मोट्या संकटात सापडली आहे. यावर बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी स्पष्ट वक्तव्य केलं. आता मित्रराष्ट्रही पाकिस्तानकडे या नजरेनं पाहायला लागलेत, जो सातत्यानं पैशांची भिक मागतोय, असं ते म्हणाले. छोट्या देशांच्या अर्थव्यवस्थांनीही पाकिस्तानला मागे टाकलं आहे आणि आपण गेल्या ७५ वर्षांपासून कटोरा घेऊन फिरत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

“आज आम्ही कोणत्याही मित्र देशांकडे जातो किंवा त्यांना फोन करतो तेव्हा त्यांना वाटतं की आपण पैसे मागायला आलो आहोत. पहिलेच देशाची अर्थव्यवस्था आव्हानात्मक बनली आहे आणि परिस्थितीचा सामना करत आहे. आता पुरानं याला आणखी संकटात टाकलं आहे,” असं शरीफ म्हणाल्याचे पाकिस्तानातील वृत्तपत्र द डॉन नं म्हटलं आहे.

३० वर्षांतील सर्वात मोठा पूर
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला आता पुरानं झोडपलं आहे. पाकिस्तानात ३० वर्षांतील सर्वात मोठा पूर आलाय. यामध्ये १४०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तर ३.३ कोटी लोकांवर मोठं संकट ओढावलंय. यामध्ये पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला दुहेरी फटकाही बसलाय.

एक तृतीयांश भाग पाण्याखाली
पाकिस्तानातील एक तृतीयांश भाग पाण्याखाली गेलाय. तर दुसरीकडे २.१ कोटी एकर पिकही पाण्याखाली गेलंय. यामुळे जवळपास १२ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालंय. अमेरिकेसह अनेक देशांनी पाकिस्तानला मदतीचा हातही पुढे केलाय.

Web Title: pm shehbaz sharif says even friendly nations started looking at pakistan as beggars 75 years we are asking for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.