रशियात शरण पत्करलेल्या बशर अल असद यांच्यावर विषप्रयोग; गुप्तहेराच्या दाव्याने खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 10:12 IST2025-01-03T10:12:14+5:302025-01-03T10:12:23+5:30

२०२० मध्ये सुरु झालेल्या या चॅनेलवर ही घटना येताच जगभरात खळबळ उडाली, यावर रशियाने असे काही घडले नसल्याचे म्हटले आहे. 

Poisoning attempt on syria leader Bashar al-Assad, who took refuge in Russia; Spy's claim creates stir | रशियात शरण पत्करलेल्या बशर अल असद यांच्यावर विषप्रयोग; गुप्तहेराच्या दाव्याने खळबळ 

रशियात शरण पत्करलेल्या बशर अल असद यांच्यावर विषप्रयोग; गुप्तहेराच्या दाव्याने खळबळ 

रशियामध्ये राजकीय शरण घेतलेले सिरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा दावा रशियन गुप्तचराने केला आहे. असद यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्याने टेलिग्राम चॅनलवर केल्याने खळबळ उडाली आहे. असद यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्या रक्तात विषाचे अंश सापडल्याचे त्याने यात म्हटले आहे. 

रशियाच्या एका माजी गुप्तहेराचा जनरल एसव्हीआर असा टेलिग्राम चॅनेल आहे. यावर तो वेगवेगळे खळबळजनक दावे करत असतो. रविवारी असद यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली. परंतू त्यांची तब्येत बिघडत चालली होती. त्यांना जोराचा खोकला होता आणि श्वास गुदमरत होता. 

उपचार करूनही त्यांना काही फरक पडत नव्हता. यामुळे त्यांना पाणी देण्यात आले. त्यांची डोकेदुखी वाढली होती व पोटातही दुखू लागले होते. यानंतर पुतीन यांच्या कार्यालयाला याची माहिती देण्यात आली. तिथून घरीच उपचार करा असा निरोप देण्यात आला. असद यांच्या रक्तात विष कुठून आले, कोणी त्यांना ते दिले याची माहिती मिळू शकलेली नाही. 

२०२० मध्ये सुरु झालेल्या या चॅनेलवर ही घटना येताच जगभरात खळबळ उडाली, यावर रशियाने असे काही घडले नसल्याचे म्हटले आहे. 

Web Title: Poisoning attempt on syria leader Bashar al-Assad, who took refuge in Russia; Spy's claim creates stir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.