OMG पोकेमॉन 'खुळे'! आजोबा सायकलवर तब्बल 64 फोन लावून खेळत हिंडतात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 02:36 PM2020-06-26T14:36:12+5:302020-06-26T14:44:28+5:30
गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या सायकलवरील फोनची संख्या वाढू लागली आहे. सोशल मिडीयावर जो नवीन फोटो व्हायरल होत आहे त्यामध्ये त्यांच्या सायकलला स्मार्टफोन लावण्यासाठी 72 स्लॉट देण्यात आलेले आहेत.
जगात 4 जी आल्यानंतर अनेकांना मोबाईलवर तासंतास गेम खेळत बसण्याचे वेड लागले आहे. काही लोकांना या गेम्सचे एवढे वेड लागले आहे की, ते काहीतरी वेगळे करत आहेत. असाच एक अजब प्रकार समोर आला आहे. एका 72 वर्षांच्या वृद्धाने त्याच्या सायकलवर तब्बल 64 फोन लावले आहेत. यावर ते पोकेमॉन गो हा गेम खेळत शहरभर हिंडत असतात.
तैवानमध्ये हे पोकेमॉन प्रेमी आजोबा असून ते पोकेमॉन गो ग्रँडपा या नावाने प्रसिद्ध आहेत. याआधीही त्यांचा फोटो 2018 मध्ये व्हायरल झाला होता. यावेळी त्यांनी सायकलवर 6 फोन लावले होते. या फोनवर ते एकाचेळी पोकेमॉन गो खेळत असतात.
त्यांचे नाव चेन सैन युआन आहे. ते एक निवृत्त फेंगशुई शिक्षक आहेत. चेन यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या नातवामुळे गेमची आवड निर्माण झाली. यानंतर ते एक व्यसनच बनले. चेन आठवड्यातून 5-६ दिवस सलग 20 तास पोकेमॉन गो गेम खेळत असतात. फोनची बॅटरी संपल्याचा गेमवर परिणाम जाणवू नये यासाठी त्यांनी वेगळी शक्कल लढविली आहे. त्यांनी जवळपास 64 फोन खरेदी केले आहेत आणि त्यांच्या सायकलवर लावले आहेत. हे फोन चार्ज करण्यासाठी सायकललाच चार्जर लावण्यात आला आहे. यामुळे हे फोन सतत चालू राहतात.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या सायकलवरील फोनची संख्या वाढू लागली आहे. सोशल मिडीयावर जो नवीन फोटो व्हायरल होत आहे त्यामध्ये त्यांच्या सायकलला स्मार्टफोन लावण्यासाठी 72 स्लॉट देण्यात आलेले आहेत. सध्या त्यांनी 64 फोन लावले आहेत. बाकीची जागा सध्या रिकामी आहे. काही लोकांनी चेन यांच्या या चैनीचे कौतूक तर काहींनी चिंता व्यक्त केली आहे. एका युजरने मोराच्या पिसाऱ्यासारखे फोन लावल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, हे खूप धोक्याचे आहे. एका युजरने मजेमध्ये चेन हे सर्वाच वरच्या फोनपर्यंत कसे पोहोचत असतील असे विचारले आहे. तर अन्य एका युजरने सर्वात वरची रिकामी रांग स्पॉन्सशिपची वाट पाहत आहे, असे म्हटले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोदी सरकार मोठा निर्णय घेणार; नोकरदारांना ग्रॅच्युईटीमध्ये दिलासा देणार
चीनच नाही, अमेरिकाही विश्वासघातकी! एकेकाळी भारतावरच हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते
सोन्याला 'ऐतिहासिक' झळाळी, तोळ्याचा दर 50 हजार पार; दोन वर्षांत होईल 'चमत्कार'
बाबो! तब्बल 841 किमीच्या स्पीडने महिलेने कार पळवली; मृत्यूनंतर गिनिज बुकात नोंद
बहिष्काराचा धसका! Xiaomi ने दालनांवरील लोगो झाकले; 'Made in India' लिहिले
Coronil: रामदेव बाबांच्या कोरोनिल औषधावर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
Unlock1.0 घाम फोडणार! डिझेल पहिल्यांदाच 80 पार; महागाई वाढणार