ब्राझीलमध्ये रोज सहा जणांना ठार मारतात पोलीस
By admin | Published: November 13, 2014 02:00 AM2014-11-13T02:00:48+5:302014-11-13T02:00:48+5:30
ब्राझील पोलिसांनी 2क्क्9 ते 2क्13 दरम्यान 11 हजार 197 लोकांना ठार मारले. याचा अर्थ त्यांनी रोज सरासरी 6 लोकांचा जीव घेतला.
Next
साओ पाउलो : ब्राझील पोलिसांनी 2क्क्9 ते 2क्13 दरम्यान 11 हजार 197 लोकांना ठार मारले. याचा अर्थ त्यांनी रोज सरासरी 6 लोकांचा जीव घेतला.
नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात येथील ‘फोरम ऑन पब्लिक सेफ्टी’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या अभ्यासात ही बाब उघड झाली आहे. ब्राझील पोलीस हिंसाचार व गुन्हे रोखण्यासाठी बळाचा क्रूरपणो वापर करतात, असे प्रत्यक्ष साक्षीदारांचे म्हणणो आहे.
गेल्या वर्षी हत्यांशी संबंधित प्रकरणात 5क्,8क्6 लोक ठार झाले. याचा अर्थ दर 1क् मिनिटांनी एक व्यक्ती मारली गेली, असे या अभ्यासात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)