अमेरिकेत आंदोलना दरम्यान पोलिसांवर गोळीबार, पाच पोलिस ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2016 01:16 PM2016-07-08T13:16:56+5:302016-07-08T16:55:27+5:30
अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील डल्लास शहरात गुरुवारी रात्री आंदोलनाच्यावेळी दोन बंदुकधा-यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला.
ऑनलाइन लोकमत
डल्लास, दि. ८ - अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील डल्लास शहरात गुरुवारी रात्री आंदोलन सुरु असताना बंदुकधा-यांनी पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबारात पाच पोलिस अधिकारी ठार झाले आणि सात पोलिस जखमी झाले. अमेरिकेत पोलिसांनी कृष्णवर्णीयांवर केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ आंदोलन सुरु असताना ही गोळीबाराची घटना घडली.
तीन संशयिताना अटक केली असून, एकाने घबराट निर्माण करण्यासाठी टेक्सासमध्ये सर्वत्र बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. घटनास्थळावर अजून एक संशयित असून पोलिस आणि त्याच्यामध्ये चर्चा सुरु आहे. चौथा हल्लेखोर बधण्यास तयार नसून आणखी पोलिसांना नुकसान पोहोचवणार असल्याचे त्याने सांगितले. डल्लासचे पोलिस प्रमुख डेव्हीड ब्राऊन यांनी ही माहिती दिली.
दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरु केला. त्यामुळे पोलिसांना सावरण्याचा वेळच मिळाला नाही. एक नागरीकही या गोळीबारात जखमी झाल्याचे महापौर माईक रॉलिंगस यांनी सांगितले. या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर डल्लासवरुन विमाने उड्डाणे बंद करण्यात आली आहेत.
बाटॉन, लुसियाना, मिनीसोटा येथे पोलिसांनी कृष्णवर्णीयांवर केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यासाठी नागरीक डल्लास येथे मोठया संख्येने जमले होते. रात्री पावणेनऊच्या सुमारास गोळीबार सुरु झाला होता.
This is one of our suspects. Please help us find him! pic.twitter.com/Na5T8ZxSz6
— Dallas Police Depart (@DallasPD) July 8, 2016