अमेरिकेत सापडलेला मृतदेह भारतातून दत्तक घेतलेल्या मुलीचाच, पोलिसांनी दिला दुजोरा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 08:38 AM2017-10-25T08:38:19+5:302017-10-25T11:21:49+5:30
अमेरिकेच्या रिचर्डसनमधून सोमवारी पोलिसांना एका मुलीचा मृतदेह सापडला होता. तो मृतदेह भारतातून दत्तक घेण्यात आलेल्या मुलीचा असल्याचं सिद्ध झालं आहे.
ह्युस्टन- अमेरिकेच्या रिचर्डसनमधून सोमवारी पोलिसांना एका मुलीचा मृतदेह सापडला होता. तो मृतदेह भारतातून दत्तक घेण्यात आलेल्या मुलीचा असल्याचं सिद्ध झालं आहे. सोमवारी मॅथ्युज दाम्पत्याच्या घरापासून १ किमी अंतरावरील पादचाऱ्यांसाठी असलेल्या एका बोगद्यात एका मुलीचा मृतदेह सापडला. हा मृतदेह शेरीलचाच असावा, असा पोलिसांना संशय होता. तो संशय खरा ठरला असून दोन आठवड्यांपासून बेपत्ता असलेल्या शेरीनचा तो मृतदेह असल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. तो मृतदेह शेरीनचा असल्याचं सिद्ध होताच पोलिसांनी शेरीनच्या वडिलांना अटक केली. जबरदस्ती दूध प्यायला दिल्याने शेरीनचा श्वास अडकला आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याची कबूली शेरीनच्या वडिलांनी दिली. त्यानंतर शेरीनच्या मृतदेहाचा बंदोबस्त केल्याचं त्याने सांगितलं आहे. मुलगी बेपत्ता झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी पोलिसांनी वेस्ली मॅथ्यूला अटक केली.
‘शेरीनला खोकला येऊ लागला. तिचा श्वास मंदावला. वेस्लेला तिच्या हाताची नाडीही जाणवत नव्हती. तिचा मृत्यू झाला, असा त्याचा समज झाला’ असं वेस्लेच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. तीन वर्षांच्या लेकीच्या मृत्यूप्रकरणी वेस्ले मॅथ्यूजला सोमवारी अटक करण्यात आली. वेस्लेच्या पत्नीवर गुन्हेगारी ठपका ठेवण्यात आलेला नाही. शेरील गायब झाली, त्यावेळी आपण झोपल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. लहान मुलाला गंभीर इजा केल्याप्रकरणी सोमवारी रात्री त्याला अटक करण्यात आली.
वेस्लेचा बनाव
शेरीन दूध पित नसल्यामुळे आपण तिला पहाटे तीन वाजता घराबाहेर झाडाखाली उभं राहण्यास सांगितलं. 15 मिनिटांनी तिला पाहण्यासाठी बाहेर आलं असता, ती कुठेच दिसली नाही, असा दावा वेस्लेने केला होता. ही घटना घडून पाच तास उलटल्यानंतरही त्याने शेरीन बेपत्ता असल्याची तक्रार दिली नसल्याने पोलिसांच्या भुवया उंचावल्या होत्या.
नेमकं प्रकरण काय?
मूळचे केरळचे असलेल्या विस्ले (३७) व सिनी मॅथ्युज या दाम्पत्याने भारतातून शेरीन या मुलीला दत्तक घेतलं होतं. शेरीन दूध पित नसल्याने संतापलेल्या विस्ले याने शिक्षा म्हणून तिला एकटीला ७ ऑक्टोबरच्या पहाटे तीनच्या सुमारास घरामागील मोकळ्या जागेत उभं ठेवलं. रिचर्डसन शहरातील या भागात कोल्हे व जंगली कुत्र्यांचा वावर असतो, याची जाणीव असूनही या पित्याने तिला ही शिक्षा दिली. तेव्हापासून शेरीन बेपत्ता झाली होती. टेक्सास पोलिसांना सोमवारी मॅथ्युज दाम्पत्याच्या घरापासून १ किमी अंतरावरील पादचाऱ्यांसाठी असलेल्या एका बोगद्यात एका मुलीचा मृतदेह सापडला. हा मृतदेह शेरीलचाच असावा, असा पोलिसांना संशय होता. त्या दृष्टीने तपास सुरू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी विसले याला अटक केली व अडीच लाख डॉलरच्या जातमुचलक्यावर सुटका केली. घटनेप्रसंगी शेरीलची आई सिनी झोपलेली होती.