त्या सामन्यावर पोलिसांची नजर

By admin | Published: May 29, 2014 04:39 AM2014-05-29T04:39:01+5:302014-05-29T04:39:01+5:30

नायजेरियाचा लंडनमध्ये स्कॉटलंडविरुद्ध होणार्‍या विश्वचषक फुटबॉल सराव सामन्यावर पोलिसांची विशेष नजर असणार आहे़ कारण, या लढतीत मॅच फिक्सिंग होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़

Police look at that match | त्या सामन्यावर पोलिसांची नजर

त्या सामन्यावर पोलिसांची नजर

Next

लंडन : नायजेरियाचा लंडनमध्ये स्कॉटलंडविरुद्ध होणार्‍या विश्वचषक फुटबॉल सराव सामन्यावर पोलिसांची विशेष नजर असणार आहे़ कारण, या लढतीत मॅच फिक्सिंग होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ नॅशनल क्राईम एजन्सी (एनसीए) या सारख्या गंभीर आणि सुनियोजित गुन्ह्याची चौकशी करू शकते़ डेली टेलिग्राफ ने दिलेल्या वृत्तानुसार एनसीएने विश्व फुटबॉल संचालन संस्था फीफाला क्रावेज कॉटेज येथे होणार्‍या सामन्यात फिक्सिंग होऊ शकते, अशी चेतावणी जारी करण्यास सांगितले आहे़ या संदर्भात स्कॉटिश एफए प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही या प्रकरणी अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे़ या सामन्यासाठी आम्ही सामान्य पद्धतीने तयारी करणार आहोत़ दरम्यान, नायजेरियाचे प्रशिक्षक स्टीफन केशी यांनी एका वृत्त वाहिनीला सांगितले की, आम्हाला या संदर्भात काहीच माहिती नाही़ आम्ही येथे केवळ सामना खेळण्यासाठी आलो आहे़ सामना जिकणे हेच आमचे मूळ लक्ष्य असणार आहे़ (वृत्तसंस्था)

Web Title: Police look at that match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.