पोलीस अधिकाऱ्याने कारच्या बोनेटवर ठेवले होते महिलेशी शरीरसंबंध, कोर्टाचा निर्णय वाचून हैराण व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 01:30 PM2021-08-04T13:30:30+5:302021-08-04T13:34:07+5:30
‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, चार वर्षाआधीच्या या केसबाबत कोर्टाने पोलीस ऑफिसरच्या बाजूने निर्णय दिला आहे. २०१७ मध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
यूनिफॉर्म घालून एका महिलेसोबत घाणेरडं काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. आयरलॅंडच्या एका स्थानिक कोर्टाने पोलीस ऑफिसरला नोकरीहून काढण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना दणका देत त्याला पुन्हा ड्युटी जॉईन करण्याच आदेश दिला आहे. पोलीस अधिकाऱ्यावर आरोप होता की, त्याने एका पॉर्न स्टारसोबत पोलीस कारवर शारीरिक संबंध ठेवले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला हता.
‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, चार वर्षाआधीच्या या केसबाबत कोर्टाने पोलीस ऑफिसरच्या बाजूने निर्णय दिला आहे. २०१७ मध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एक पोलीस अधिकारी एका पॉर्न स्टारसोबत पोलीस कारवर संबंध ठेवताना दिसला होता. या व्हिडीओत पोलिसाचा चेहरा दिसला नव्हता, पण त्याची ओळख पटली होती. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. (हे पण वाचा : शरीरसंबंधासाठी पतीला झोपेतून उठवण्याच्या नादात महिला पडली, अर्ध्या शरीराला मारला लकवा...)
चौकशीनंतर पोलीस आयुक्त डू हॅरिस आरोपीला बरखास्त करणार होते. ज्याच्या विरोधात त्याने कोर्टाची मदत घेतली. व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे की, एका पोलीस अधिकारी हात साखळीने बांधलेल्या महिलेसोबत उभा आहे. दोघे काहीतरी बोलतात. त्यानंतर पोलीस अधिकारी महिलेसोबत कारच्या बोनेटवर संबंध ठेवताना दिसतो. व्हिडीओ जवळच उभा असलेला तिसरा व्यक्ती बनवतो. तो मधे मधे कमेंटही करतो. हा व्हिडीओ पॉर्न वेबसाइटवर अपलोड करण्यात आला होता. ज्यानंतर तो व्हायरल झाला होता.
कोर्टाच्या निर्णयावर Porn Star Carla Gabbeerlove ने आनंद व्यक्त केलाय. ती म्हणाली की, 'मी पोलीस अधिकाऱ्याच्या बाजूने निर्णय लागल्याने फार आनंदी आहे'. व्हायरल व्हिडीओमुळे पॉर्न स्टार कार्ला एकाएकी चर्चेत आली होती. अपलोड केल्यावर लगेच १२ हजार लोकांनी व्हिडीओ पाहिला होता. कार्ला हे स्वत:ही मान्य करते की, त्या व्हिडीओने तिला फेमस केलं.