पोलिसांनी पंतप्रधानांना सुनावले; नियमभंगाच्या प्रसंगाचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 09:52 AM2023-03-16T09:52:37+5:302023-03-16T09:52:53+5:30

दोन महिन्यांपूर्वी गाडी चालवताना सीट बेल्ट न लावल्याने पोलिसांनी दंड वसूल केला होता.

police told the prime minister rishi sunak a video was also taken of the violation incident | पोलिसांनी पंतप्रधानांना सुनावले; नियमभंगाच्या प्रसंगाचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले

पोलिसांनी पंतप्रधानांना सुनावले; नियमभंगाच्या प्रसंगाचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले

googlenewsNext

लंडन: ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक व त्यांची पत्नी अक्षता मूर्ती हे आपल्या पाळीव कुत्र्याला साखळी न बांधता त्याला लंडनमधील प्रसिद्ध हाइड पार्क परिसरात फिरवत होते. त्यावेळी तेथील विशिष्ट भागात  कुत्र्याला फिरविताना त्याच्या गळ्यात साखळी असणे आवश्यक आहे, या नियमाची पोलिसांनी सुनक यांना जाणीव करून दिली. देशाचा पंतप्रधान नियमभंग करताना दिसला तर त्याला ब्रिटनमधील एखादा पोलिसही तसे स्पष्टपणे सांगू शकतो या गोष्टीचे दर्शन सुनक यांच्या प्रसंगामुळे जगाला पुन्हा एकदा झाले. 

लॅब्राडाॅर जातीच्या कुत्र्याच्या गळ्यात साखळी बांधलेली नव्हती. नियमभंगाच्या प्रसंगाचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)

याआधीही नियमभंग

ऋषी सुनक यांनी केलेल्या नियमभंगाबद्दल त्यांच्या कारवाई करण्याचा विचार नाही, असे ब्रिटनच्या पोलिसांनी सांगितले. नियम न पाळण्याबद्दल सुनक याआधीही अडचणीत आले होते. दोन महिन्यांपूर्वी गाडी चालवताना सीट बेल्ट न लावल्याने पोलिसांनी त्यांच्याकडून दंड वसूल केला होता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: police told the prime minister rishi sunak a video was also taken of the violation incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.