गेले होते ड्रग्ज शोधायला; पाकिस्तानच्या विद्यापीठातील विद्यार्थिनींचे ५००० अश्लील व्हिडीओ सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 05:54 PM2023-07-24T17:54:19+5:302023-07-24T17:54:29+5:30

पाकिस्तानातील पंजाब पोलिसांनी एक विशेष रिपोर्ट दाखल केला आहे. यामध्ये इस्लामिया यूनिवर्सिटी बहावलपुर ड्रग्ज आणि सेक्स कांडाचा अड्डा बनल्याचे म्हटले आहे.

Police went to look for drugs; 5000 pornographic videos of Pakistani university students found | गेले होते ड्रग्ज शोधायला; पाकिस्तानच्या विद्यापीठातील विद्यार्थिनींचे ५००० अश्लील व्हिडीओ सापडले

गेले होते ड्रग्ज शोधायला; पाकिस्तानच्या विद्यापीठातील विद्यार्थिनींचे ५००० अश्लील व्हिडीओ सापडले

googlenewsNext

पाकिस्तानची इस्लामिया विद्यापीठात ड्रग्ज आणि मोठ्या प्रमाणावर अश्लिल व्हिडीओ सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी टाकलेल्या छापमारीत ड्रग्जचा वापर करणाऱ्यांविरोधात चौकशीसाठी ५ टीम तय़ार केल्या होत्या. यामध्ये जवळपास ५००० सेक्स क्लिप मिळाल्या आहेत. विद्यार्थीनींना ड्रग्ज देऊन त्यांना ब्लॅकमेल करत त्यांच्या अश्लील क्लिप काढण्यात आल्या आहेत. 

पाकिस्तानातील पंजाब पोलिसांनी एक विशेष रिपोर्ट दाखल केला आहे. यामध्ये इस्लामिया यूनिवर्सिटी बहावलपुर ड्रग्ज आणि सेक्स कांडाचा अड्डा बनल्याचे म्हटले आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा वापर केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. तपासासाठी 5 सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. सुरुवातीला पोलिसांना ड्रग रॅकेटचे पुरावे सापडले, परंतू ज्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडील अश्लील व्हिडीओ पाहून पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली. 

विद्यापीठाचा मुख्य सुरक्षा अधिकारी एजाज शाह याच्या मोबाईल फोनमध्ये 5000 अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. विद्यापीठात ११३ विद्यार्थ्यांचे ड्रग रेकॉर्ड समोर आले आहे. विद्यार्थीनींचे अश्लील व्हिडीओ आणि छायाचित्रे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
फॉरेन्सिक चाचणीही घेण्यात आली असून अधिकाऱ्यांनी हा अहवाल पंजाबच्या हंगामी मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. 

एजाजकडे ड्रग्जही सापडले आहे, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या मोबाईलमधून विद्यापीठातील महिला अधिकारी आणि विद्यार्थिनींशी संबंधित अश्लील गोष्टी जप्त केल्या आहेत. 

Web Title: Police went to look for drugs; 5000 pornographic videos of Pakistani university students found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.