ब्रिटिश नागरिकाच्या विष्ठेतून पोलिओ विषाणूचा उत्सर्ग
By admin | Published: August 30, 2015 10:24 PM2015-08-30T22:24:41+5:302015-08-30T22:24:41+5:30
ब्रिटिश नागरिक गेल्या २८ वर्षांपासून त्याच्या विष्ठेतून पोलिओचा विषाणू बाहेर टाकत आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जर प्रतिकारशक्ती पुरेशी नसेल तर असे घडू शकते,
लंडन : ब्रिटिश नागरिक गेल्या २८ वर्षांपासून त्याच्या विष्ठेतून पोलिओचा विषाणू बाहेर टाकत आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जर प्रतिकारशक्ती पुरेशी नसेल तर असे घडू शकते, असे अटलांटा येथील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे ओलेन किव यांनी म्हटले. या व्यक्तीला तोंडावाटे पोलिओचा डोस देण्यात आला होता. त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती पुरेशी नसल्यामुळे हे घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कमी प्रतिकार क्षमतेमुळे त्याच्या शरीरात पोलिओचा प्रतिविषाणू तयार झाला. अर्थात, असे घडणे ही काही दुर्मिळ बाब नाही; परंतु प्रदीर्घकाळ विषाणू तयार होण्याचे हे नोंद असलेले उदाहरण आहे, असे किव यांनी आपल्या संशोधन अहवालात म्हटले आहे. एखादी व्यक्ती जर पुरेशा प्रमाणात प्रतिजैविके तयार करू शकत नसेल, तर त्याच्या शरीरात किती काळ हा विषाणू फिरत राहावा याला काही मर्यादा नाही, असे विषाणू तज्ज्ञ किव म्हणाले. या व्यक्तीच्या नावावर या विषाणूचा विक्रम नोंदला गेलेला आहे व प्रत्येक जणाला ते मान्य आहे, असेही ते म्हणाले. हा विषाणू मूळ स्वरूपात जसा असतो तसाच तो शरीरात नसतो. त्याचे स्वरूप काहीसे बदलले जाते. कारण मानवाच्या शरीरातील प्रथिनांच्या हल्ल्यामुळे ते बदलते. सध्याची पोलिओची लस ही पोलिओच्या विषाणूचे स्वरूप कितीही बदलले तरी त्यापासून मानवाचे संरक्षण करण्यास सक्षम आहे. तरीही त्यांच्यातील बदलांकडे सतत लक्ष द्यावे लागते, असे या अहवालाचे सहलेखक व विषाणूतज्ज्ञ झेवियर मार्टिन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)