श्रीलंकेत मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाचा गोळीबार; एकाचा मृत्यू तर दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 09:20 PM2018-10-28T21:20:22+5:302018-10-28T21:20:55+5:30
श्रीलंकेत मोठे राजकीय संकट ओढावले आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच रविवारी मोठी हिंसक घटना घडली.
कोलंबो : श्रीलंकेत मोठे राजकीय संकट ओढावले आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच रविवारी मोठी हिंसक घटना घडली.
माजी पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा यांच्या सुरक्षा रक्षकाने जमावावर गोळीबार केला. यात एक जण ठार झाला तर दोन जखमी झाले. सुरक्षा रक्षकाने ज्यावेळी गोळीबार केला. तेव्हा अर्जुन रणतुंगा आपल्या कार्यालयात जात होते. अर्जुन रणतुंगा सुखरुप असून या घटनेनंतर या सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली. दरम्यान, सुरक्षा रक्षकाने हा गोळीबार कोणत्या उद्देशाने केला, याबाबत अद्याप कोणताही माहिती मिळू शकली नाही.
शुक्रवारी राष्ट्रपती मैत्रीपाला श्रीसेना यांनी राजपक्षे यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली होती. मात्र संसदेच्या अध्यक्षांनी रानिल विक्रमसिंघे यांना पुन्हा पंतप्रधान म्हणून मान्यता दिली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी रानिल विक्रमसिंघे यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांची भेट घेत संसदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. आपल्याकडे बहुमत असल्याचाही दावाही विक्रमसिंघे यांनी केला होता. असे असूनही राष्ट्रपतींनी शनिवारी संसदेला १९ नोव्हेंबरपर्यंत संस्थगित ठेवले आहे. नवीन पंतप्रधान महिंद्रा राजपाक्षे यांना संसदेत बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा, या उद्देशाने राष्ट्रपतींनी हा निर्णय घेतला. दुसरीकडे मी अजूनही देशाचा पंतप्रधान आहे, असा दावा विक्रमसिंघे यांनी केला होता.
Mahinda Rajapakse who has been recently appointed as the new Prime Minister of Sri Lanka issues statement, says,"The UNP-UPFA government came to an end as the result of the UPFA leaving the coalition. I was invited to accept the position of PM with a view of forming a new govt." pic.twitter.com/QP2iOm3zQk
— ANI (@ANI) October 28, 2018