राजकीय धुळवडीची पातळी घसरली
By admin | Published: March 26, 2016 12:49 AM2016-03-26T00:49:31+5:302016-03-26T00:49:31+5:30
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच आता या आरोप-प्रत्यारोपाने पातळी सोडली आहे. रिपब्लिकनचे सर्वात प्रबळ
वॉशिंग्टन : अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच आता या आरोप-प्रत्यारोपाने पातळी सोडली आहे. रिपब्लिकनचे सर्वात प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प आणि टेड क्रूज यांनी चक्क एकमेकांच्या पत्नींवर आक्षेपार्ह आरोप करीत अमेरिकेच्या राजकारणाची दुसरी बाजू समोर आणली आहे.
टेक्सासचे सिनेटर क्रूज पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मला त्रस्त करणे सोपे नाही. खरे तर मी राग व्यक्त करीत नाही; पण आपण माझ्या पत्नीला, मुलांना लक्ष्य करीत आहात आणि असे प्रकार आपण वारंवार करीत आहात. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून क्रूज यांच्या पत्नी हिदी यांच्यावर टीका केली जात असतानाच नाराज क्रूज म्हणाले की, डोनाल्ड तुम्ही डरपोक आहात. कृपा करून हिदीबाबत बोलू नका. (वृत्तसंस्था)
1) या वादाला सुरुवात तेव्हा झाली जेव्हा क्रूज यांचा प्रचार करणाऱ्या एका समितीने ट्रम्प यांची पत्नी मेलेनियाचे कथित निर्वस्त्र छायाचित्र प्रसिद्ध केले. त्यावर भडकलेले ट्रम्प म्हणाले की, आपण क्रूज यांच्या पत्नीचे रहस्य समोर आणू, तर मेलेनियाचे जे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही, असे मत क्रूज यांनी व्यक्त केले आहे.
2) ट्रम्प यांनी टिष्ट्वटरवर एक छायाचित्र पोस्ट केले आहे. यात आपली पत्नी आणि माजी मॉडेल मेलेनिया व क्रूज यांची पत्नी हिदी यांची तुलना केली आहे. यात म्हटले आहे की, एका छायाचित्राचे मूल्य हे एक हजार शब्दांएवढे असते.
3) प्रत्युत्तरात क्रूज यांनी म्हटले आहे की, डोनाल्ड, जे खरे पुरुष असतात ते महिलांवर हल्ला करीत नाहीत. तुमची पत्नी सुंदर आहे, तर हिदी माझ्या आयुष्यातील प्रेम आहे.