चीनमध्ये राजकीय उलथापालथ, केंद्रीय समितीत मोठे फेरबदल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 05:45 AM2022-10-23T05:45:36+5:302022-10-23T06:52:21+5:30

केंद्रीय समितीत मोठे फेरबदल झाले असून पंतप्रधान ली केकियांग यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना वगळण्यात आले आहे.

Political upheaval in China, major reshuffle in Central Committee | चीनमध्ये राजकीय उलथापालथ, केंद्रीय समितीत मोठे फेरबदल

चीनमध्ये राजकीय उलथापालथ, केंद्रीय समितीत मोठे फेरबदल

Next

बीजिंग : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (६९) हे तिसऱ्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी सज्ज झाले आहेत. सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टीच्या शक्तिशाली केंद्रीय समितीवर त्यांची निवड झाली आहे. केंद्रीय समितीत मोठे फेरबदल झाले असून पंतप्रधान ली केकियांग यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना वगळण्यात आले आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष हु जिंताओ यांना बैठकीतून बळजबरीने बाहेर काढण्यात आले. तसेच चीनने आपल्या संविधानात तैवानच्या स्वातंत्र्याचा विरोध समाविष्ट केला आहे. स्थायी समिती आता पक्षाच्या सरचिटणीसांची निवड करणार आहे. ते पक्षाचे आणि देशाचे नेतृत्व करतील. शी जिनपिंग हे सरचिटणीस होण्याच्या मार्गावर आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Political upheaval in China, major reshuffle in Central Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.