राजकारणात चतुर असलेले शरीफ दुसऱ्यांदा पंतप्रधान; विश्वासाबद्दल भाऊ, मित्रपक्षांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 07:33 AM2024-03-04T07:33:40+5:302024-03-04T07:34:56+5:30
७२ वर्षीय शाहबाज यांना ३३६ सदस्यांच्या सभागृहात २०१ मते मिळाली, जी आवश्यक असलेल्या मतांपेक्षा ३२ अधिक आहेत.
इस्लामाबाद : उत्तम प्रशासक आणि चतुर राजकारणी म्हणून ओळखले जाणारे पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन)चे शाहबाज शरीफ दुसऱ्यांदा पाकिस्तानचेपंतप्रधान झाले आहेत. ते आता नवीन आघाडी सरकारचे नेतृत्व करणार आहेत. यावेळी त्यांनी विश्वास ठेवल्याबद्दल भाऊ, मित्रपक्षांचे आभार मानले.
७२ वर्षीय शाहबाज यांना ३३६ सदस्यांच्या सभागृहात २०१ मते मिळाली, जी आवश्यक असलेल्या मतांपेक्षा ३२ अधिक आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआयचे ओमर अयुब खान यांना ९२ मते मिळाली. पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे आव्हान त्यांच्यासमाेर आहे.
राजकीय कारकीर्द
- १९८८मध्ये ते सर्वप्रथम आमदार
- १९९० मध्ये ते सर्वप्रथम खासदार
- १९९३ ते १९९६ या काळात पंजाब विधानसभेत विराेधी पक्षनेते हाेते.
- १९९७ ते १९९९ या काळात ते पंजाबचे सर्वप्रथम मुख्यमंत्री
- २००८ ते २०१८ या कालावधीत ते पुन्हा पंजाबचे मुख्यमंत्री हाेते.
- २०१८ ते २०२२ या काळात ते संसदेत विराेधी पक्षनेते हाेते.
- २०२२मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान
संकटात मोठी मदत
पाकिस्तान दिवाळखाेरीच्या उंबरठ्यावर असताना आयएमएफकडून त्यांनी आर्थिक पॅकेज पदरी पाडण्यात यश मिळविले. पंतप्रधानपदाच्या १६ महिन्यांच्या कारकिर्दीत त्यांनी माेठे भाऊ नवाझ यांच्यावरील भ्रष्टाचाराची प्रकरणे मिटवून त्यांना पाकिस्तानात परत आणले.