पोप म्हणाले, गरीब व बेघर ‘अज्ञात संत’
By admin | Published: November 3, 2014 02:53 AM2014-11-03T02:53:41+5:302014-11-03T02:53:41+5:30
पोप फ्रान्सिस यांनी युद्ध, भूक व गरिबी यांच्याशी जीवघेणा संघर्ष करीत असलेले लोक, बेरोजगार व बेघर जनता यांना ‘अज्ञात संत’ संबोधत त्यांना अभिवादन केले
रोम : पोप फ्रान्सिस यांनी युद्ध, भूक व गरिबी यांच्याशी जीवघेणा संघर्ष करीत असलेले लोक, बेरोजगार व बेघर जनता यांना ‘अज्ञात संत’ संबोधत त्यांना अभिवादन केले. कॅथॉलिक चर्चच्या एका प्रार्थनासभेत ते बोलत होते.
एक नोव्हेंबर रोजी आयोजित प्रार्थना सभेचा दिवस संत दिन म्हणून साजरा करण्यात आला आणि व्हेरानो दफनभूमीत धर्मोपदेश दिला. जे लोक सुरक्षिततेसाठी घरदार-गाव सोडून, भूक, आजार व थंडीचा सामना करत आहेत, अशा लोकांना पोप यांनी अभिवादन केले. अशा लोकांना अनेकदा निर्वासित म्हणून संबोधण्यावर पोप यांनी नाराजी व्यक्त केली.
पोप यांनी कष्ट झेलणाऱ्या या लोकांचे कौतुक करत त्यांना ‘अज्ञात संत’ म्हणून संबोधले. शांतता, रोटी आणि काम यासाठी दिवसेंदिवस या लोकांची भटकंती सुरूच असल्याचे पोप म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)