"...म्हणून कोरोनाचा सामना करण्यात जगातील 'हे' दिग्गज नेते ठरले अपयशी; मोदी मात्र यशस्वी"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 08:58 PM2020-07-23T20:58:12+5:302020-07-23T20:59:29+5:30

मात्र, कोरोनासारख्या नव्या महामारीचा सामना करण्याची वेळ आली तेव्हा, लोप्रिय होण्याच्या नीती पेक्षाही यूरोपातील जर्मनी, फ्रान्स आणि आयर्लंड तसेच आशियातील दक्षिण कोरिया आणि जपान सारख्या देशांत उदार लोकशाहीवादी नीतीच फायदेशीर ठरल्याचे दिसते.

populist leader failed in fighting the epidemic modi showed aggression says Michael Shifter  | "...म्हणून कोरोनाचा सामना करण्यात जगातील 'हे' दिग्गज नेते ठरले अपयशी; मोदी मात्र यशस्वी"

"...म्हणून कोरोनाचा सामना करण्यात जगातील 'हे' दिग्गज नेते ठरले अपयशी; मोदी मात्र यशस्वी"

Next

वॉशिंग्टन - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला गराडा घातला आहे. या जागतीक महामारीने अनेकांचे बळी घेतले. अनेकांचे संसार उद्धवस्त केले. खरे तर, या महामारीने ज्या देशांत सर्वाधिक थैमान घातले आणि बळी घेतले, ते देश गरीब आहेत, की श्रीमंत, अधिक लोकसंख्येचे आहेत, की कमी लोकसंख्येचे हा मुद्दा गौन आहे. मात्र, या देशांत एक समानता आहे. ती म्हणजे तेथील नेते. या देशांचे नेते अधिक लोकप्रिय आणि परंपरेपेक्षा काहीसे वेगळे चालणारे आहेत. हे नेते सर्वसामान्य जनतेत 'लोकप्रिय आहेत मात्र, तज्ज्ञांमध्ये नाही. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि ब्राझीलचे जेयर बोलसोनारो यांच्यासह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॅक्सिकोचे आंद्रेस मॅनुअल लोपेझ ओब्राडोर हे जनतेला आकर्षित करणारी आश्वासने देऊन आणि आणि जुन्या व्यवस्थेला आव्हान देत लोकशाही वादी देशांत सत्तेवर आले आहेत.

मात्र, कोरोनासारख्या नव्या महामारीचा सामना करण्याची वेळ आली तेव्हा, लोप्रिय होण्याच्या नीती पेक्षाही यूरोपातील जर्मनी, फ्रान्स आणि आयर्लंड तसेच आशियातील दक्षिण कोरिया आणि जपान सारख्या देशांत उदार लोकशाहीवादी नीतीच फायदेशीर ठरल्याचे दिसते.

वॉशिंग्टन येथील थिंक टँक 'इंटर-अमेरिकन डायलॉग'चे अध्यक्ष मायकल शिफ्टर म्हणाले, 'हे एक सार्वजनिक आरोग्य संकट आहे. ज्याचा सामना करण्यासाठी तज्ज्ञांची आणि विज्ञानाची आवश्यकता आहे. लोकप्रियतेमागे धावण्याचा स्वभाव असणारे नेते तज्ज्ञांची आणि विज्ञानाची अवहेलना करतात. ब्राझील आणि अमेरिकेत तज्ज्ञ दृष्टीकोन आहे. मात्र, जेथे लोकप्रियतेमागे धावण्याच्या नीतीचा अवलंब होत असेल, तेथे तो लागू करणे अत्यंत कठीन होते. ज्यामुळे समस्यांतून मार्ग निघतो अथवा किमान प्रभावीपणे संकटांचा सामना तरी केला जाऊ शकतो.'

वैज्ञानिकांवर शंका - 
अमेरिका, ब्राझील, ब्रिटन आणि मॅक्सिको सारख्या देशांचे नेतृत्व असे नेते करत आहेत, ज्यांना वैज्ञानिकांवर शंका आहे आणि ज्यांनी सुरुवातीच्या काळात, या आजाराला गांभीर्याने घेतलेच नाही. कोरोना व्हायरसमुळे जगात 618,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील अधिकांश लोकांचे बळी या चार देशांतच गेले आहेत. मात्र, या काळात भारताने अत्यंत चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली आहे. तेथील कोरोना व्हायरसने संक्रमित झालेल्या लोकांच्या संख्येने अत्ताच 12 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर दुसरीकडे, भारतात मोदींनी लॉकडाउनच्या माध्यमाने या आजाराचा सामना करण्यासाठी मोठी आक्रामकता दाखवली, असेही मायकल शिफ्टर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या -

कोरोनापासून बचावासाठी लसीचे एकहून अधिक डोस घ्यावे लागतील!; बिल गेट्स यांचं मोठं विधान

CAAचा फायदा घेण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम करताहेत धर्मांतर, 'या' धर्माचा करत आहेत स्वीकार, सरकार अलर्ट!

CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus : वैज्ञानिकांचा दावा!; कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या 'या' औषधाने, फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा

Web Title: populist leader failed in fighting the epidemic modi showed aggression says Michael Shifter 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.