आशेचा किरण! कोरोना लसीवर उद्या होऊ शकते 'पॉझिटिव्ह' घोषणा; पुण्याच्या सीरम इन्सिट्युटचाही मोठा वाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 07:58 PM2020-07-15T19:58:41+5:302020-07-15T22:01:00+5:30
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने अॅस्ट्रा झिनेका या कंपनीने COVID-19 वरील लस तयार केली आहे. महत्वाचे म्हणजे या लसीची तिसरी आणि शेवटची मानवी चाचणी सुरु आहे.
लंडन : कोरोनाने त्रासलेल्या जगासाठी उद्याचा दिवस एक मोठा आशेचा किरण घेऊन येणार आहे. कोरोनावरील लसीबाबत उद्या, गुरुवारी महत्वाची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे आयटीव्हीचे राजकीय पत्रकार रॉबर्ट पेस्टॉन यांनी सुत्रांच्या हवाल्याने सांगितले.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने अॅस्ट्रा झिनेका या कंपनीने COVID-19 वरील लस तयार केली आहे. महत्वाचे म्हणजे या लसीची तिसरी आणि शेवटची मानवी चाचणी सुरु आहे. अॅस्ट्रा झिनेका (AstraZeneca) या कंपनीने या व्हॅक्सिनचे लायसन्स मिळविले आहे. ही लस 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींवर प्रभावी ठरली आहे. परंतू अद्याप पहिल्या मानवी चाचणीचे अहवाल यायचे आहेत. ही लस बनविणाऱ्या संशोधकांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सांगितले की, या लसीच्या चाचणीवेळी रुग्णांच्या वाढलेल्या प्रतिकार शक्तीने आम्हाला आश्चर्यचकित केले आहे.
कोरोनावरील लसीबाबत मी एक पॉझिटिव्ह बातमी ऐकली आहे. AstraZeneca व ऑक्सफर्ड विद्यापीठाने बनविलेल्या चाचणीच्या तिसऱ्या स्टेजमध्ये असलेल्या कोरोना लसीबाबत लवकरच चांगली घोषणा होणार आहे. कदाचित उद्या.,असे रॉबर्ट पेस्टॉन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
लसींच्या बाजारात सीरम इन्स्टिट्यूटचा दबदबा; जाणून घ्या या अब्जाधिशाबाबत
पुण्यात बनणार...
अॅस्ट्रा झिनेकाच्या या लसीचे पुण्यात उत्पादन सुरु करण्यात आले आहे. अॅस्ट्रा झिनेका ही ब्रिटिश-स्वीडिश फार्मास्युटिकल कंपनी आहे. या कंपनीने भारताशी हातमिळवणी केली असून पुण्याचा सीरम इन्स्टिट्यूटसोबत मिळून या व्हॅक्सिनच्या उत्पादनालाही सुरुवात केली आहे. या कोरोना लसीचे 1 अब्ज व्हायल्स बनविण्यात येणार असून ही लस कमी उत्पन्न असलेल्या देशांनाही पुरविली जाणार आहे. यापैकी 40 कोटी व्हॅक्सिन 2020 च्या अखेरपर्यंत तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. एप्रिलमध्येच सीरम इन्स्टिट्युटने याची घोषणा केली होती. यासाठी आपण मोठी रिस्क घेत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. भारतात या लसीची किंमत १००० रुपये असू शकते. सीरम ही ही कंपनी जगातील सर्वात मोठी औषधे निर्माण करणारी कंपनी आहे. सीरम इंस्टिट्यूट वर्षाला जवळपास १.५ अब्ज लसींचे उत्पादन करते. तर जगातील १७० देशांमध्ये त्याचा पुरवठा केला जातो. कंपनी अनेक जीव वाचविणारी लस बनविते. यामध्ये पोलिओ, फ्ल्यू, डीटीपी, आर हिपेटायटीस बी, रुबेला, मम्प्स, टिटनसचेचक अशा आजारांवरील औषधांचा समावेश आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
कुठेय लॉकडाऊन; कुठेय मंदी! भारतातल्या सर्वांत महागड्या फ्लॅटची खरेदी; किंमत पाहून हादराल
Breaking : बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर
Reliance AGM 2020: कोरोना लसीवर नीता अंबानींची मोठी घोषणा; इतिहासात पहिल्यांदाच भाषण
गेहलोत यांची सचिन पायलटांवर वैयक्तीक टीका; काँग्रेस नेतृत्व झाले नाराज
...तर 2 अब्जांनी पृथ्वीवरील लोकसंख्या कमी होईल; कोरोना महामारीनंतर मोठा इशारा
...तेव्हा सुशांत कुठे होता? मोदी भेटीवरून भाजपा खासदाराचा बॉलिवूडकरांना सवाल
सोने स्वस्त झाले! झटपट जाणून घ्या आजचे दर