'या' वर्षी कोरोना लस येणार का?; खुद्द ऑक्सफर्डच्या डेव्हलपर्सनी दिले मोठे 'अपडेट'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 07:03 PM2020-07-21T19:03:49+5:302020-07-21T19:22:32+5:30

डेव्हलपर सारा गिलबर्ट यांनी बीबीसी रेडिओशी बोलताना सांगितले, 'या वर्षाच्या अखेरपर्यंत लस आणण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. मात्र, यासंदर्भात कसल्याही प्रकारची निश्चितता नही. कारण आम्हाला तीन गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे.

possible but not certain Corona vaccine rolled out this year says oxford developer | 'या' वर्षी कोरोना लस येणार का?; खुद्द ऑक्सफर्डच्या डेव्हलपर्सनी दिले मोठे 'अपडेट'

'या' वर्षी कोरोना लस येणार का?; खुद्द ऑक्सफर्डच्या डेव्हलपर्सनी दिले मोठे 'अपडेट'

Next
ठळक मुद्देया वर्षाच्या अखेरपर्यंत लस आणण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.यावर्षी सप्टेंबरपर्यंत कोरोना लसीचे लाखो डोस तयार करण्याचे लक्ष.कोरोना व्हायरससाठी अद्याप कुठल्याही लसीला मंजुरी मिळालेली नाही.


लंडन - कोरोना व्हायरसवरील लस केव्हापर्यंत येणार याकडे संपूर्ण जागाचे लक्ष लागले आहे. कोरोनाचा वाढत धोका लक्षात घेता, यावरील लसीसंदर्भात लोकांना सातत्याने अपडेट्स हवे आहेत. आता ही लस केव्हापर्यंत येईल यावर खुद्द ऑक्सफर्डच्या डेव्हलपर्सनीच भाष्य केले आहे. डेव्हलपर्सनी म्हटले आहे, की ऑक्सफर्डची जी लस, 'सुरक्षित' असल्याचे म्हटले जात आहे, ती या वर्षाच्या अखेरपर्यंत येऊ शकते. मात्र, ही लस याच वर्षी येईल हे अद्याप निश्चित नाही. याला काही प्रमाणात उशीरही होऊ शकतो.

डेव्हलपर सारा गिलबर्ट यांनी बीबीसी रेडिओशी बोलताना सांगितले, 'या वर्षाच्या अखेरपर्यंत लस आणण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. मात्र, यासंदर्भात कसल्याही प्रकारची निश्चितता नही. कारण आम्हाला तीन गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे.' त्या म्हणाल्या, अखेरच्या टप्प्यात लसीचा सकारात्मक निकाल आवश्यक आहे. यानंतर हिचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे आवश्यक राहील. तसेच, यासाठी लायसन्सचीही प्रक्रियी महत्वाची आहे.

सारा म्हणाल्या, लसीच्या वापरासाठी वरील तीनही गोष्टी अनिवार्य आहेत. यानंतरच ती उलब्ध होऊ शकेल. एवढेच नाही, तर ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांनी यावर्षी सप्टेंबरपर्यंत कोरोना लसीचे लाखो डोस तयार करण्याचे लक्ष ठेवले आहे. तसेच, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत लसीची अखेरच्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे आणि अमेरिकेत सुरू होणार आहे. 

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या मेडिसिन विभागातील प्रोफेसर जॉन बेल म्हणतात, महत्वाची गोष्ट ही,की पुरेसे लोक व्हायरसमुळे प्रभावित झाले, यानंतर त्यांच्यावर लसीचा चांगला परिणाम झाला. यामुळे ही लस, सुरक्षित आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास सक्षम असल्याचे दिसून आले.

कोरोना व्हायरससाठी अद्याप कुठल्याही लसीला मंजुरी मिळालेली नाही. मात्र, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लस एक प्रमुख लस म्हणून सिद्ध होणार असल्याचे जागतीक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus : वैज्ञानिकांचा दावा!; कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या 'या' औषधाने, फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा

CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?

आई शप्पथ!...रशियातील काही उद्योगपती, नेत्यांनी एप्रिलमध्येच घेतली कोरोनावरील लस

बुरखा फाटला!, सरकार PLA सोबत संबंध असणाऱ्या कंपन्यांविरोधात अॅक्शन घेण्याच्या तयारीत

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

Web Title: possible but not certain Corona vaccine rolled out this year says oxford developer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.