फेसबुक पोस्ट टाकताय? आधी घड्याळ बघा !
By admin | Published: July 4, 2015 02:46 AM2015-07-04T02:46:15+5:302015-07-04T02:46:15+5:30
आपल्या मनात आलेली एखादी सुंदर कल्पना, एखादे स्वत:चे छायाचित्र आपण अगदी उत्साहाने फेसबुकवर टाकतो. या पोस्टला चांगला प्रतिसाद मिळावा, भरपूर लाईक्स
सॅन फ्रॅन्सिस्को : आपल्या मनात आलेली एखादी सुंदर कल्पना, एखादे स्वत:चे छायाचित्र आपण अगदी उत्साहाने फेसबुकवर टाकतो. या पोस्टला चांगला प्रतिसाद मिळावा, भरपूर लाईक्स याव्यात अशी आपली इच्छा असते. पण दरवेळी एवढ्या लाईक्स आपल्याला मिळतातच असे नाही. मग आपला विरस होतो. फेसबुक पोस्टला मिळणाऱ्या प्रतिसादामागे ती पोस्ट पाठविण्याची वेळ सर्वात महत्त्वाची असते. वेळ जशी असेल तसा प्रतिसाद मिळतो असा नव्या अभ्यासाचा निष्कर्ष आहे.
सॅन फ्रॅन्सिस्को येथील लिथियम टेक्नॉलॉजीने हे संशोधन केले असून, त्यांच्या मते फेसबुक पोस्टला मिळणारे लाईक्स टाईमझोन, वॉलवर पडणाऱ्या मेसेजची संख्या, स्थान, युजर्सची दिनचर्या या बाबीवर अवलंबून असते.
सोमवार ते शुक्रवार या दिवशी कामाच्या वेळात व सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान टाकलेल्या पोस्टला भरपूर लाईक्स मिळतात. शनिवारी, रविवारी फेसबुक पाहणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी असते, असे आढळून आले आहे. १२० दिवस हे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यासाठी १४ लाख पोस्टस् व त्यावर आलेल्या प्रतिक्रिया यांचा अभ्यास करण्यात आला आहे.
ज्या लोकांना झटपट प्रतिक्रिया हव्या असतील, त्यांनी फेसबुकऐवजी टिष्ट्वटरचा वापर करावा. फेसबुकवर पहिली प्रतिक्रिया मिळण्यास दोन तास लागतात. टिष्ट्वटरवर तीच प्रतिक्रिया अर्ध्या तासात मिळू शकते, असाही या सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. (वृत्तसंस्था)