चीनचा संभाव्य धोका : अमेरिका, इंग्लंड आशियात तैनात करणार सैन्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 04:55 AM2020-07-06T04:55:47+5:302020-07-06T04:56:48+5:30
अमेरिकेने आपले हजारो सैनिक जपानपासून आॅस्ट्रेलियापर्यंत संपूर्ण आशियात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या तैनातीनंतर अमेरिकन सैन्याचा वैश्विक दरारा पुन्हा एकदा कायम होईल, असे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला वाटते.
वॉशिंग्टन/लंडन : भारतासह आशियातील शेजारील देशांसोबत दादागिरी करणाऱ्या चीनला वठणीवर आणण्यासाठी दोन बलाढ्य देशांनी कंबर कसली आहे. अमेरिकेने आपले हजारो सैनिक जपानपासून आॅस्ट्रेलियापर्यंत संपूर्ण आशियात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
या तैनातीनंतर अमेरिकन सैन्याचा वैश्विक दरारा पुन्हा एकदा कायम होईल, असे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला वाटते. अमेरिकेशिवाय इंग्लंडनेही आपले हजारो जवान अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणा-या स्वेज कालव्याजवळ तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका जर्मनीमध्ये तैनात असलेले आपले हजारो सैनिक आता आशियात तैनात करणार आहे. हे सैनिक अमेरिकेच्या गुआम, हवाई, अलास्का, जपान आणि आॅस्ट्रेलियातील सैन्य ठिकाणांवर तैनात केले जातील. जपानच्या निक्केई आशियन रिव्ह्यूच्या अहवालानुसार आता अमेरिकेची प्राथमिकता बदलली आहे.
अमेरिकेच्या निशाण्यावर चीन
२०००
च्या दशकात अमेरिकेचे मुख्य लक्ष्य दहशतवाद होते. त्यांनी इराक आणि अफगाणिस्तानमधील दहशतवादाविरोधात युद्ध पुकारले होते.
ट्रम्प यांचे राष्ट्रीय संरक्षण सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी गेल्या महिन्यातील आपल्या एका लेखात म्हटले होते, की चीन आणि रशियासारख्या दोन महाशक्तींशी स्पर्धा करण्यासाठी अमेरिकन सैन्याला निश्चितपणे पुढील भागात पूर्वीच्या तुलनेत अधिक झपाट्याने सैन्य तैनाती वाढवावी लागेल.
३४,५०० वरून २५ हजारांवर
आपले सैन्य आता अमेरिका जर्मनीतील आणत आहे.
९,५००
उर्वरित सैनिक इंडो-पॅसिफिक भागात तैनात करीत आहे.
चीनवर दबाव वाढविणार इंग्लंड
एका वृत्तानुसार, चीनचा धोका ओळखून त्याचा सामना करण्यासाठी आता अमेरिकेनंतर इंग्लंडदेखील आपले सैन्य आशियात पाठवीत आहे.
आशियातील सहकारी देशांशी जवळीक वाढवून आणि स्वेज कालव्याजवळ अधिक सैनिक तैनात करून चीनवर दबाव टाकला जाऊ शकतो, असे ब्रिटिश सैन्याला वाटते. यासाठी इंग्लंडच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांनी मंत्र्यांची भेट घेतली होती.
स्वेज कालवा हा जगातील सर्वात जास्त व्यस्त मार्ग आहे. तसेच चीनचे मोठ्या प्रमाणावर सामान याच मार्गाने युरोपात जाते.
‘पीओके’मध्ये पाकिस्तानची मोठी लष्करी जमवाजमव
नवी दिल्ली : पूर्व लडाख सीमेवरील गलवान खोºयात झालेल्या हिंसक संघर्षानंतर चर्चेमध्ये ठरल्याप्रमाणे सैन्य माघारी घेण्यास चीन टाळाटाळ करत असतानाच काश्मीरला लागून असलेल्या सीमेच्या पलिकडील पाकव्याप्त काश्मीरच्या (पीओके) भागात आता पाकिस्तानने सैन्याची मोठी जमवाजमव सुरु केल्याचे वृत्त आहे.
आक्रमक आणि कणखर पवित्रा घेणाºया भारताला दोन्ही सिमांवर दबाब वाढवून कोंडीत पकडण्याचा हा डाव चीनच्या चिथावणीने पाकिस्तान खेळत असल्याचे माहितगार सूत्रांना वाटते.
सीमेच्या पलिकडील हालचालींच्या गुप्तहेरांकडून मिळणाºया माहितीच्या आधारे या सूत्रांनी सांगितले की, ‘पीओके’मधील मुजफ्पराबादसह कोतली, रावलाकोट, बिंभर, बाग याखेरीज अन्य ठिकाणी सैन्यदलांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करून पाकिस्तानने सीमेजवळील उपस्थिती दुप्पट करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. गलवान खोºयातील संघर्षानंतर या हालचालींना वेग येणे लक्षणीय आहे.
सूत्रांनुसार कोतली येथे तीन ब्रिगेडसह पाकिस्तान रेजिमेंटच्या २८ तुकड्याव ४० ‘आरटी’ तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवाय रावलकोट येथे दोन ब्रिगेडसह ९ ‘पीआर’, विंभर येते चार ब्रिगेडसह १५ लाइट इन्फन्ट्री तर बाग येथे सहा ब्रिगेडसह १० नॉर्दन लाइट इन्फन्ट्री आणण्यात आली आहे. सियाचीनमध्ये ८० ब्रिगेडसह ७२ पीआर आणून ठेवण्यात आले आहेत.
भूतानच्या सीमा वादग्रस्त असल्याचा चीनचा कांगावा
नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये गलवान खोºयात आगळीक करणाºया चीनने भारताला कोंडीत पकडण्यासाठी आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. भूतानसमवेत पूर्व भागात सीमेवरून वाद असल्याचे चीनने म्हटले आहे. भूतानची पूर्वेकडील सीमा अरुणाचल प्रदेशला लागून जाते. त्यामुळे भारतासाठीही हा सीमावाद महत्त्वाचा आहे.
भूतानसोबतचा सीमावाद कधीच संपुष्टात आला नव्हता. भूतानसमवेत असलेल्या सीमावादाबाबत चीनने त्या देशाबरोबर १९८४ ते २०१६ या कालावधीत २४ बैठका घेतल्या. मात्र त्यात केवळ पश्चिम व मध्य क्षेत्रातील सीमेच्या तंट्याबाबत चर्चा झाल्याचा दावा चीनने केला आहे. भूतान व चीनने सीमाभागातील मध्य व पश्चिम क्षेत्रात सीमावाद असल्याचे मान्य केले होते. पण आता भूतानला लागून असलेल्या सीमेवर पूर्व बाजूच्या जमिनीवर चीन हक्क सांगू लागला आहे. या भागात सीमावाद असल्याचे भूतानला मान्य नाही.
भूतानच्या सीमेवरील पूर्व बाजूचा भाग अरुणाचल प्रदेशला लागून असल्याने हा विषय भारतासाठीही महत्त्वाचा आहे. भूतान हा भारताचा मित्र आहे. त्यामुळेच भूतानबरोबरच्या वादात तिसºया देशाने हस्तक्षेप करू नये असा इशारा चीनने भारताचे नाव न घेता दिला आहे.
मोदींच्या लडाख भेटीने सैन्याचे मनोबल वाढले
नवी दिल्ली : पूर्व लडाख सीमेवर चीनशी तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष सीमेवर येऊन जवानांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्याने सैन्य दलांचे मनोबल द्विगुणित झाले आहे, असे चीनला लागून असलेल्या ३,४८८ कि.मी. लांबीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या भारत तिबेट सीमा पोलीस या निमलष्करी दलाचे महासंचालक एस.एस. देसवाल यांनी रविवारी येथे सांगितले.
दक्षिण दिल्लीतीत छत्तरपूर येथे उभारलेल्या १० हजार खाटांच्या कोविड केंद्राच्या उद्घाटनानंतर देसवाल पत्रकारांशी बोलत होते. या केंद्राच्या वैद्यकीय व्यवस्थापनाची जबाबदारी ‘आयटीबीपी’कडे आहे.