गेल्या तीस वर्षात जगाला हादरवणारे शक्तीशाली भूकंप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 01:59 PM2017-09-08T13:59:06+5:302017-09-08T16:11:31+5:30

मेक्सिकोमध्ये समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या भूकंपामुळे तेथे मोठी हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या तीस वर्षांमध्ये याप्रकारचे अनेक शक्तीशाली भूकंप झाले आहेत.

 The powerful earthquake striking the world in the last thirty years | गेल्या तीस वर्षात जगाला हादरवणारे शक्तीशाली भूकंप

गेल्या तीस वर्षात जगाला हादरवणारे शक्तीशाली भूकंप

googlenewsNext

मुंबई, दि.8- मेक्सिकोमध्ये समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या भूकंपामुळे तेथे मोठी हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या तीस वर्षांमध्ये याप्रकारचे अनेक शक्तीशाली भूकंप झाले आहेत. त्यापैकी 6 रिश्टर स्केलपेक्षा जास्त असणारे व सर्वाधीक हानी पोहोचवणारे भूकंप पुढीलप्रमाणे

20 ऑगस्ट 1988- नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात 721 लोकांचे प्राण गेले तसेच भारतातील बिहार राज्यात या भूकंपामुळे 277 लोक मृत्युमुखी पडले.

20 ऑक्टोबर 1991- उत्तर प्रदेशात 6.6 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपात 768 लोक मृत्युमुखी पडले.

30 सप्टेंबर 1993- किल्लारी येथे 6.2 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने मोठी हानी. 9 हजारांहून अधिक लोकांचे प्राण गेले. पहाटे झालेल्या या भूकंपामुळे मोठे आर्थिक नुकसानही झाले.

26 जानेवारी 2001- गुजरातमध्ये झालेल्या 7.7 रिश्टर तीव्रतेच्या मोठ्या भूकंपामुळे 20 हजार लोकांचे प्राण गेले व दीड लाखांहून अधिक लोक जखमी झाले. भारताच्या अलिकडच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी भूकंप समजला जातो.

26 डिसेंबर 2003- इराणमधील बाम येथे झालेल्या 607 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपात 31,884 लोक मृत्युमुखी पडले आणि 18 हजार लोक जखमी झाले.

26 डिसेंबर 2004- सुमात्रा येथे आलेल्या 9.3 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे हिंदी महासागरामध्ये त्सुनामी लाटा निर्माण झाल्या. यामुळे विविध देशांमधील 2,20,000 लोकांचे प्राण गेले त्यामध्ये 1 लाख 68 हजार लोक इंडोनेशियाचे होते.

28 मार्च 2005- इंडोनेशियातील नियास बेटेवरील भूकंपात 900 लोक मृत्युमुखी पडले.

8 ऑक्टोबर 2005- पाकिस्तानमध्ये 7.6 रिश्टर स्केल भूकंपामुळे 75 हजार लोकांचे प्राण गेले. या भूकंपामुळे 35 लाख लोकांना आपली घरेदारे सोडावी लागली.

27 मे 2006 - इंडोनेशियातील योगकार्ता येथे झालेल्या मोठ्या भूकंपामुळे 6 हजार लोकांचे प्राण गेले तर दीड लाख लोकांना आपली घरे गमवावी लागली.

12 मे 2008- चीनमधील सिचुआन प्रांतात 8 रिश्टर तीव्रतेच्या भूरंपामुळे 87 हजार लोकांचे प्राण गेले तर अनेक लोक बेपत्ता झाले.

14 एप्रिल 2010- चीनच्या वायव्येकडील क्वींन्घाई प्रांतात 6.9 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे 3 हजार लोकांचे प्राण गेले.

12 जानेवारी 2010- 7 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याने हैतीमधील जनजीवन विस्कळीत. अडिच ते तीन लाख लोक मृत्युमुखी पडले.

23 ऑक्टोबर 2011- तुर्कस्थानात 7.2 रिश्टर तीव्रतेचा भूकंप आल्यामुऴे 600 लोक मृत्युमुखी पडले तर 4150 लोक जखमी झाले.

11 मार्च 2011- जपानच्या किनाऱ्यावर आलेल्या 9 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे त्सुनामी लाटा निर्माण झाल्या. यामध्ये 18,900 लोकांचे प्राण गेले तसेच दाईची येथील अणूप्रकल्पास धोका निर्माण झाला.

11 ऑगस्ट 2012- इराणमधील तेबरिझ येथे 6.3 आणि 6.4 अशा तीव्रतेचे सलग दोन भूकंप झाले. यामध्ये 306 लोक मृत्यू पावले तर 3000 लोक जखमी झाले.

25 एप्रिल 2015- नेपाळमध्ये 7.8 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे 8,900 लोक मृत्युमुखी पडले तसेच पाच लाख लोकांना आपल्या घरादारास मुकावे लागले.

26 ऑक्टोबर 2015- अफगाणिस्तानातील हिंदुकुश प्रांतामध्ये 7.5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. याचे धक्के भारतीय उपखंडात दूरवर जाणवले.

फेब्रुवारी 2016- तैवानच्या तैनान येथे झालेल्या 6.4 तीव्रतेच्या भूकंपात 100 लोक मृत्युमुखी पडले.

16 एप्रिल 2016- इक्वेडोर येथे 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे 673 लोकांचे प्राण गेले तसेच इमारती कोसळून मोठे नुकसान झाले.

24 ऑगस्ट 2016- इटलीमध्ये 6.2 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे 300 लोक मृत्युमुखी पडले.

8 ऑगस्ट 2017-चीनच्या वायव्य प्रांतातील भूकंपामुळे 24 लोकांचे प्राण गेले.

Web Title:  The powerful earthquake striking the world in the last thirty years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.