श्रीलंकेतील सरकारची अमेरिकेकडून प्रशंसा
By Admin | Published: May 2, 2015 11:01 PM2015-05-02T23:01:48+5:302015-05-02T23:01:48+5:30
लोकशाही, शांतता प्रक्रिया आणि मानवी हक्काला चालना देण्यासह अल्पसंख्यक तामिळींशी सामंजस्य राखण्याच्या प्रयत्नाबद्दल अमेरिकेने श्रीलंकेतील नवीन सरकारची प्रशंसा केली आहे.
कोलंबो : लोकशाही, शांतता प्रक्रिया आणि मानवी हक्काला चालना देण्यासह अल्पसंख्यक तामिळींशी सामंजस्य राखण्याच्या प्रयत्नाबद्दल अमेरिकेने श्रीलंकेतील नवीन सरकारची प्रशंसा केली आहे.
श्रीलंकेच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे विदेशमंत्री जॉन केरी यांनी श्रीलंकेचे विदेशमंत्री मंगल समरवीरा यांच्यासोबत द्विपक्षयी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी श्रीलंकेतील नवीन सरकारची प्रशंसा केली. गेल्या एका दशकात श्रीलंकेला भेट देणारे अमेरिकेचे ते पहिले विदेशमंत्री होय.
श्रीलंका सरकारने दारे खुली करण्यासोबत नव-नवीन विचारांसाठी मनाची कवाडेही खुली आहेत, ही बाब भावली.
शांततेसोबत जनतेला समृद्ध करण्यासाठीही श्रीलंका सरकारने काम हाती घेतले आहे. महत्त्वाचे म्हणजे अल्पसंख्यक तामिळीसोबत समेटासाठी या सरकारने पावले टाकली आहेत, अशा शब्दांत केरी यांनी मैत्रीपाल सिरिसेना यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारची प्रशंसा केली. (वृत्तसंस्था)