जीआयकेआयएल घोटाळ्यात उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे भाऊ प्रमोद मित्तल यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 11:37 AM2019-07-24T11:37:28+5:302019-07-24T11:40:36+5:30
उद्योगपती प्रमोद मित्तल यांना फसवणूक आणि सत्तेचा दुरुपयोग केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
बोस्निया: स्टील सम्राट असलेल्या लक्ष्मी मित्तल यांचे लहान भाऊ आणि उद्योगपती प्रमोद मित्तल यांना फसवणूक आणि सत्तेचा दुरुपयोग केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. जीआयकेआयएलमध्ये घोटाळा केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. प्रमोद मित्तल 2003पासून ही कंपनी चालवत आहेत. या कंपनीत एक हजार कर्मचारी कार्यरत आहेत. जीआयकेआयएलमध्ये ते अध्यक्ष आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार या घोटाळ्यात कंपनीचे जनरल मॅनेजर परमेश भट्टाचार्य आणि सुपरवायजरी बोर्डाच्या आणखी एका सदस्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात प्रमोद मित्तल दोषी आढळल्यास त्यांना 45 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता सरकारी वकिलांनी व्यक्त केली आहे.
Indian businessman Pramod Mittal has been detained by police at a company in northern Bosnia on suspicion of organised crime and abuse of office, a prosecutor said on Tuesday: Reuters
— ANI (@ANI) July 24, 2019
मीडिया रिपोर्ट्नुसार, मित्तल आणि इतर दोघांनी मिळून 28 लाख डॉलर (19.32 कोटी रुपये)ची अफरातफर केल्याचा आरोप आहे. मार्चमध्ये प्रमोद मित्तल यांना मोठे भाऊ लक्ष्मी मित्तल यांनी 1600 कोटी रुपये देऊन कारवाईपासून वाचवलं होतं. प्रमोद यांच्यावर स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एसटीसी)चं 2210 कोटी रुपयांचं कर्ज आहे.