प्रवीण्ड जगन्नाथ बनले मॉरिशसचे नवे पंतप्रधान

By Admin | Published: January 24, 2017 12:56 AM2017-01-24T00:56:30+5:302017-01-24T00:56:30+5:30

भारतीय वंशाचे अनिरुद्ध जगन्नाथ यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानपदाचा सोमवारी राजीनामा दिला आणि पंतप्रधानपदाची

Pravind Jagannath became the new Prime Minister of Mauritius | प्रवीण्ड जगन्नाथ बनले मॉरिशसचे नवे पंतप्रधान

प्रवीण्ड जगन्नाथ बनले मॉरिशसचे नवे पंतप्रधान

googlenewsNext

पोर्ट लुईस : भारतीय वंशाचे अनिरुद्ध जगन्नाथ यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानपदाचा सोमवारी राजीनामा दिला आणि पंतप्रधानपदाची सूत्रे आपले पुत्र प्रवीण्ड जगन्नाथ यांच्याकडे सोपविली. अनिरुद्ध जगन्नाथ यांनी राजीनाम्यानंतर संसदेच्या निवडणुका जाहीर कराव्यात, अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र ती अमान्य करण्यात आली. अनिरुद्ध जगन्नाथ (वय ८६) यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र राष्ट्रपतींना सादर केले. तिथे राष्ट्रपतीपद हे शोभेचे असते. मात्र राजीनामा त्यांच्याकडेच द्यावा लागतो. त्यांच्या राजीनाम्यानंतर प्रवीण्ड जगन्नाथ यांच्या पंतप्रधान म्हणून नियुक्तीचे पत्र राष्ट्रपती अमीनाह फिरदोस गुरीब-हकीम यांनी लगेचच जारी केले. नवीन रक्ताला वाव देण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे मावळत्या पंतप्रधानांनी जाहीर केले. त्यांचे पुत्र प्रवीण्ड (वय ५५) हे सध्या अर्थमंत्री होते.

Web Title: Pravind Jagannath became the new Prime Minister of Mauritius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.