मौल्यवान खड्डा...

By admin | Published: April 3, 2017 05:12 AM2017-04-03T05:12:22+5:302017-04-03T05:12:22+5:30

एरव्ही खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले जात असले तरी पूर्वसायबेरियातील एक खड्डा खूपच मौल्यवान आहे.

Precious pit ... | मौल्यवान खड्डा...

मौल्यवान खड्डा...

Next

मॉस्को : एरव्ही खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले जात असले तरी पूर्वसायबेरियातील एक खड्डा खूपच मौल्यवान आहे. तुम्ही म्हणाल, काय सांगता? तर, होय... हा खड्डा खरंच मौल्यवान आहे. या खड्ड्याची किंमत १,१३३ अब्ज रुपये आहे. डायमंड सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिर खाणपट्ट्यातील हा खड्डा असून, तो इतर खड्ड्याप्रमाणे अतिशय धोकादायक आहे. कारण आकाशी उडणारे हेलिकॉप्टर्स हा खड्डा खेचून गिळंकृत करतो. दरवर्षी यातून २ लाख कॅरेटस् हिरे काढले जातात. २०१४ मध्येही यातील भुयारातून ६ दशलक्ष कॅरेटस्चे कच्चे हिरे काढण्यात आले होते. या पसिरातील अशाच खड्ड्यांतून (खदानी) जगाच्या तुलनेत २३ टक्के हिरे काढले जातात. येथे आढळणाऱ्या हिऱ्यांचा आकार गोल्फच्या चेंडूएवढा असतो. या खड्ड्याची मालकी अलरोसा या रशियन कंपनीकडे आहे. ही खदान १,७२२ फूट आणि एकूण परीघ साडेतीन किलोमीटर आहे.

Web Title: Precious pit ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.