ब्रिटनमध्ये प्रीती पटेल रोजगार खात्याच्या मंत्री
By admin | Published: May 11, 2015 11:33 PM2015-05-11T23:33:34+5:302015-05-11T23:33:34+5:30
ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या प्रभावशाली संसद सदस्यांपैकी एक प्रीती पटेल (४३) यांना पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी सोमवारी रोजगार मंत्रालयाची जबाबदारी दिली.
Next
लंडन : ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या प्रभावशाली संसद सदस्यांपैकी एक प्रीती पटेल (४३) यांना पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी सोमवारी रोजगार मंत्रालयाची जबाबदारी दिली.
सात मे रोजी ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रीती पटेल या एसेक्स प्रांतातील विथॅम येथून मोठे मताधिक्य घेऊन पुन्हा निवडून आल्या आहेत. मंत्रीपदी नियुक्ती होणे ही खरोखरच गौरवाची बाब आहे, असे प्रीती पटेल यांनी टिष्ट्वटर संदेशात म्हटले. पटेल यांचा जन्म लंडनमधील असून त्यांना एक अपत्य आहे. ही नवी जबाबदारी मिळण्यापूर्वी त्या सत्ताधारी पक्षाच्या कोषागार सचिव होत्या.(वृत्तसंस्था)