इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची गर्भवती वागदत्ता आयसोलेशनमध्ये, ट्विट करत महिलांना दिला असा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 07:14 PM2020-04-05T19:14:10+5:302020-04-05T19:26:31+5:30
यापूर्वीच पंतप्रधान जॉन्सन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. ते सध्या डाउनिंग स्ट्रिट येथे आयसोलेशनमध्ये आहेत. जॉन्सन आणि कॅरी यांनी फेब्रुवारीमध्येच साखरपुड्याची घोषणा केली होती.
लंडन -इंग्लंडचेपंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची होणारी पत्नी कॅरी सायमंड्स यांच्यातही कोरोनाची लक्षणे आढळून आल्याचे समजते. त्यांनी स्वतःच रविवारी यासंदर्भात माहिती दिली. त्या पूर्वीपासूनच जॉन्सन यांच्यापासून वेगळ्या असून सेल्फ-आयसोलेशनमध्ये आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या गर्भवती आहेत.
यापूर्वीच पंतप्रधान जॉन्सन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. ते सध्या डाउनिंग स्ट्रिट येथे आयसोलेशनमध्ये आहेत. जॉन्सन आणि कॅरी यांनी फेब्रुवारीमध्येच साखरपुड्याची घोषणा केली होती.
पूर्वीपेक्षा ठीक -
कॅरी यांनी ट्विट केले आहे, की 'कोरोना व्हायरसची मुख्य लक्षणे आढळून आल्याने मी गेला पूर्ण आठवडा बेडवरच घालवला. मला टेस्टची आवश्यकता पडली नाही. आणि 7 दिवस आराम केल्यानंतर मला पूर्वीपेक्षाची चांगले वाटत आहे आणि बरी होत आहे.' कॅरी यांनी गर्भवती महिलांसाठीही काही माहिती शेअर केली आहे. तयांनी लिहिले आहे, 'COVID-19सोबत प्रेग्नंसी चिंताजनक असते. इतर गर्भवती महिलांनी, कृपाकरून ताज्या सूचना वाचाव्यात आणि त्याचे पालन करावे. ज्या मला आवडल्या आहेत.'
I’ve spent the past week in bed with the main symptoms of Coronavirus. I haven’t needed to be tested and, after seven days of rest, I feel stronger and I’m on the mend.
— Carrie Symonds (@carriesymonds) April 4, 2020
जॉन्सन आजून काही दिवस क्वारंटाईनमध्येच राहणार -
जॉन्सन यांनी शुक्रवारी ऑनलाईन माहित देताना म्हटले होते, की ते सध्या क्वारंटाईनमध्येच राहतील कारण त्यांचा ताप अद्याप कमी झालेला नाही. ते पूर्वीपेक्षा चांगले आहेत. मात्र, जोवर पूर्णपणे बरे होत नाही, तोवर ते क्वारंटाईनच राहतील. ते सध्या व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमानेच कोरोनाचा सामना करत आहेत. इंग्लंडमध्ये आतापर्यंत 41,903 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 4,313 लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे शनिवारी एका दिवसात तब्बल 700 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
अमेरिका, इटली आणि स्पेनला सर्वाधिक फटका -
कोरोना विषाणूमुळे झालेल्या प्रादुर्भावाने अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 3 लाखांहून अधिक रुग्ण असून चिंतेची बाब म्हणजे गेल्या 24 तासांत तिथे 13 हजारांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 7 हजार 900 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे आणि त्यात 450 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क आणि परिसरात सर्वाधित रुग्ण आढळले आहेत. येथील बाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. अमेरिकेखालोखाल कोरोनाने ज्या देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्यापैकी बहुतांश देश युरोपातील आहेत. आतापर्यंत इटलीमध्ये 14 हजार 700 तर स्पेनमध्ये 11 हजार 800 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. फ्रान्समध्ये 7,560, ब्रिटन 4,313, इराण 3,452, जर्मनी 1,444 लोकांचा मृत्यू झाला आहे.