CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! लेकीला जन्म देताच कोरोनामुळे मृत्यू; बाळाची एक झलकही पाहू शकली नाही आई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 11:59 AM2021-08-25T11:59:52+5:302021-08-25T12:03:46+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाने अनेकांच्या जवळची माणसं हिरावून नेली आहे. तर काहींच्या डोक्यावरचं आई-वडिलांचं छत्रच हरवलं आहे. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे.

pregnant mother dies due to coronavirus after giving birth to her baby without ever meeting her | CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! लेकीला जन्म देताच कोरोनामुळे मृत्यू; बाळाची एक झलकही पाहू शकली नाही आई

CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! लेकीला जन्म देताच कोरोनामुळे मृत्यू; बाळाची एक झलकही पाहू शकली नाही आई

Next

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 21 कोटींचा टप्पा पार केला आहे. लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला असून मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. अनेक देशांत कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल जात आहेत. याच दरम्यान अनेक मन सुन्न करणाऱ्या घटना घडत आहेत. कोरोनाने अनेकांच्या जवळची माणसं हिरावून नेली आहे. तर काहींच्या डोक्यावरचं आई-वडिलांचं छत्रच हरवलं आहे. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. कोरोनामुळे एका नवजात बाळाने आपल्या आईला गमावलं आहे. 

लेकीला जन्म देताच कोरोनामुळे एका आईचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आपल्या बाळाची एक झलकही महिला पाहू शकली नाही. आयरलँड (Ireland) मध्ये एका गर्भवती महिलेने (Pregnant Woman) बाळाला जन्म दिल्यानंतरच कोरोनाने तिचा मृत्यू झाला आहे. 35 वर्षीय समांथा विलिस (Samantha Willis) यांना लोकांनी सुपरमॉमचा दर्जा दिला आहे. समांथा यांनी तब्बल 16 दिवस कोरोनाची झुंज दिली. मात्र त्यांची ही झुंज अखेर अपयशी ठरली. मुलीला जन्म दिल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने समांथाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

पती जॉश विलिस (Josh Willis) यांनी फेसबुकवर आपल्या पत्नीला श्रद्धांजली वाहिली आहे. हा आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस असल्याचं देखील म्हटलं आहे. डेली स्टार न्यूज पोर्टलच्या रिपोर्टनुसार, समांथाच्या बाळाची प्रकृती अत्यंत उत्तम आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतातही अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपल्याने 6 मुलं अनाथ झाली आहे. मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यामध्ये अमाहा गावात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कुटुंबाची वाताहत झाली आहे. कोरोनामुळे घरातील कर्त्या मंडळींचा मृत्यू झाला आहे. 

...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं! कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपलं; 6 मुलं झाली अनाथ

कोरोनामुळे आधी वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आईला देखील जीव गमवावा लागला आहे. अवघ्या काही महिन्यांत दोघांचाही मृत्यू झाल्याने सहा मुलं आता पोरकी झाली आहेत. सर्वात मोठी मुलगी ही सात वर्षांची आहे. तर सर्वात लहान चिमुकला अवघा आठ महिन्यांचा आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने मुलीवर मदत मागण्याची वेळ आली आहे. भावंडांचं पोट भरण्यासाठी सात वर्षीय मुलगी गावातील घराघरात जाऊन अन्न मागत आहे. पतीच्या मृत्यूनंतर मुलांची आई घर चालवत होती. पण कोरोनाने तिचाही मृत्यू झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. पण आता नातेवाईकांनी देखील मुलांकडे पाठ फिरवली आहे. 

Web Title: pregnant mother dies due to coronavirus after giving birth to her baby without ever meeting her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.