प्रेग्नेंट पत्नीसोबत हनीमूनला गेला होता पती, बीचवर गोळी झाडून करण्यात आली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 11:39 AM2022-05-17T11:39:47+5:302022-05-17T11:42:49+5:30
पराग्वेतील हे हायप्रोफाइल कपल कोलंबियाच्या कार्टागेनाच्या Isla Baru मध्ये सुट्टी एन्जॉय करत होतं.
एक टीव्ही जर्नलिस्ट आपल्या पतीसोबत हनीमून साजरा करण्यासाठी गेली होती. दोघेही कोलंबियाच्या एका बीचवर एन्जॉय करत होते. तेव्हा तिच्या पतीची हत्या करण्यात आली. खास बाब म्हणजे नुकतीच तिने तिच्या प्रेग्नेन्सीची माहिती दिली होती.
पत्नी क्लाउडिया एगुइलेरा समोरच ४५ वर्षीय मार्सेलो पेक्सीची गोळी झाडून हत्या करण्यात आली. पराग्वेतील हे हायप्रोफाइल कपल कोलंबियाच्या कार्टागेनाच्या Isla Baru मध्ये सुट्टी एन्जॉय करत होतं. पेक्सीची हत्या एगुइलेराने त्याला ती प्रेग्नेंट असल्याची माहिती दिल्यावर लगेच करण्यात आली. एगुइलेरा टेलिव्हिजन नेटवर्क यूनिकॅनलसाठी काम करते. तेच पेक्सी एक ड्रग ऑफिसर होता.
एगुइलेराने कोलंबियन लॉ इंफोर्समेंट इन्वेस्टिगेटर्सला सांगितलं की, डेकॅमरॉन हॉटेलच्या बीचवर काही अज्ञात लोक आमच्याजवळ आले. काही न बोलता त्यातील एकाने पेक्सीवर गोळी झाडली. एक गोळी चेहऱ्यावर आणि दुसरी पाठीवर. कोलंबियन अधिकाऱ्यांनी अज्ञात आरोपींची माहिती देणाऱ्यांना साधारण ४ लाख रूपयांचं बक्षीस घोषित केलं आहे.
पोलीस चीफ जनरल जॉर्ज लुइस वर्गासने मीडियाला सांगितलं की, पेक्सीच्या हत्येचा धागे पराग्वेच्या हाय-प्रोफाइल मनी लॉन्ड्रिंग आणि ड्रग ट्रॅफिकिंगच्या केसेसशी जोडलेले असू शकतात. ते म्हणाले की, आम्ही ट्रान्समेशनल क्राइम सिस्टीमबाबत बोलत आहोत. हे प्लानिंग करून करण्यात आलं आहे. ज्यात बरेच पैसे लागले असतील.
प्रकरणाची चौकशी जोरात सुरू आहे. अमेरिकन ड्रग आणि दुसरे फेडरल जनरलही प्रकरणीची चौकशी करत आहेत. अधिकारी निमियो कार्डोजो म्हणाले की, पेक्सीच्या या व्हेकेशनची माहिती फार कमी लोकांना होती. तो म्हणाले की, जोपर्यंत ते आरोपींना पकडत नाहीत, तोपर्यंत शांतपणे बसणार नाही.