विराट कोहलीच्या कार्यक्रमात माल्ल्याची पत्नीसह उपस्थिती

By admin | Published: June 6, 2017 01:37 PM2017-06-06T13:37:36+5:302017-06-06T13:41:31+5:30

पाकिस्तान विरोधातील विजयानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने सोमवारी लंडनमध्ये एका चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

The presence of Malala's wife in Virat Kohli's program | विराट कोहलीच्या कार्यक्रमात माल्ल्याची पत्नीसह उपस्थिती

विराट कोहलीच्या कार्यक्रमात माल्ल्याची पत्नीसह उपस्थिती

Next

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 6 - पाकिस्तान विरोधातील विजयानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने सोमवारी लंडनमध्ये एका चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमातून जस्टिस एंड केयर ऑर्गनाइजेशनला फंड(पैसे) गोळा करणे हा उद्देश होता. ही ऑर्गनाइजेशन मानवी तस्करी थांबवण्यासाठी प्रयत्न करते आहे. कोहलीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला भारतीय बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून पसार झालेल्या विजय माल्ल्यानेही उपस्थिती लावली होती. विजय माल्ल्या आपल्या बायकोसह या कार्यक्रमात आला होता. या कार्यक्रमात कोच अनिल कुंबळे, माजी कर्णधार धोनी, युवराज, केदार जाधवसह इतर भारतीय खेळांडूनीही हजेरी लावली होती. एक्स्ट्राटाइम डॉट कॉम ने विजय माल्ल्या कार्यक्रमाला आलेल्या क्षणांचा व्हिडिओ यू-ट्यूब पेज अपलोड केला आहे.  (हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी माल्ल्याची उपस्थिती)

रविवारी बर्मिंगहॅममध्ये भारत - पाकिस्तानदरम्यान पार पडलेल्या हायव्होल्टेज सामन्यात विजय माल्ल्या बिनधास्तपणे व्हीआयपी सेक्शनमध्ये बसून भारतीय संघासाठी चिअर करत होता. त्यानंतर भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांच्यासोबतही विजय माल्ल्या चर्चा करताना दिसला. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या माल्ल्याने यानंतर ट्विटरवरुन आपलं म्हणणं मांडलं. "भारत - पाकिस्तान सामन्यासाठी माझ्या उपस्थितीला मीडियाने खूप कव्हरेज दिला. भारतीय संघाला चिअर करण्यासाठी सगळ्या सामन्यांना उपस्थित राहण्याची माझी इच्छा आहे", असं सांगत माल्ल्याने आपण बिनधास्तपणे स्टेडिअममध्ये येऊन सामने पाहणार असल्याचं सांगत एकाप्रकारे आव्हानच देऊन टाकलं आहे.

(भारत-पाक सामन्यादरम्यान गावस्कर जेव्हा माल्ल्यांना भेटतात)

दिल्लीतील विशेष न्यायालयाने परकीय चलन नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी माल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. 2016 मध्ये विजय मल्ल्याने ब्रिटनमध्ये पळ काढला होता. माल्ल्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु होते. फेब्रुवारी 2017 मध्ये भारताने ब्रिटिश सरकारकडे मल्ल्याला भारताकडे सोपवावे अशी विनंती केली होती.केंद्र सरकारने विजय मल्ल्याचा पासपोर्टही रद्द केला होता.याशिवाय त्याच्याविरोधात एक हजार पानांचे आरोपपत्रही दाखल झाले आहे.

 

Web Title: The presence of Malala's wife in Virat Kohli's program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.