George Floyd Death: व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचली विरोधाची 'आग'; ट्रम्प यांना बंकरमध्ये घ्यावी लागली 'शरण'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 09:30 AM2020-06-01T09:30:22+5:302020-06-01T09:44:37+5:30

अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध शहरात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांसाठी डाव्यांना जबाबदार धरले आहे. यामुळे निर्दोष लोक भयभीत झाले आहेत. निदर्शक उद्योग धंद्यांचेही नुकसान करत आहेत. इमारती जाळत आहेत, असे ट्रम्प म्हणाले. 

President donald trump rushed to underground bunker in white house during protest on George Floyd murder case sna | George Floyd Death: व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचली विरोधाची 'आग'; ट्रम्प यांना बंकरमध्ये घ्यावी लागली 'शरण'

George Floyd Death: व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचली विरोधाची 'आग'; ट्रम्प यांना बंकरमध्ये घ्यावी लागली 'शरण'

Next
ठळक मुद्देजॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर कृष्णवर्णीय समुदायाची निदर्शने अधिक तीव्र होताना दिसत आहेत. अमेरिकेतील तब्बल 30 शहरे हिंसेच्या आगीत होरपळत आहेत.अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध शहरात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांसाठी डाव्यांना जबाबदार धरले आहे.

वॉशिंग्टनः जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर कृष्णवर्णीय समुदायाची निदर्शने अधिक तीव्र होताना दिसत आहेत. यामुळे अमेरिकेतील तब्बल 30 शहरे हिंसेच्या आगीत होरपळत आहेत. याची झळ रविवारी व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचली. राजधानी वाशिंग्टनमध्ये तर परिस्थिती एवढी चिघळली आहे, की महापौरांनी रात्री 11 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यूची घोषणा केली आहे. तसेच, व्हाइट हाऊसजवळ सलग तिसऱ्या दिवशीही निदर्शन सुरूच होते.

व्हाइट हाऊस परिसराद तणाव -
व्हाइट हाऊसजवळ निदर्शन करत असलेल्या जमावाने तेथील कचऱ्याला आग लावली आणि पोलिसांनाही धक्काबुक्की केली. येथील परिस्थिती एवढी चिघळली, की तेथे तैनात असलेल्या सीक्रेट सर्व्हिस एजन्ट्स राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाइट हाऊसमध्ये असलेल्या संरक्षण बंकरमध्ये घेऊन गेले. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी व्हाइट हाऊसजवळील निदर्शकांना हुसकावले.


सीक्रेट सर्व्हिस एजन्ट्सनी परिधान केला दंगल विरोधी पोशाख -
रविवारीही व्हाइट हाऊसपरिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शन करणाऱ्या लोकांना हुसकावण्यासाठी तेथील सिक्रेट सर्व्हिस एजन्ट्सना रॉयट गिअर (दंगलविरोधी पोशाख) परिधान  करावा लागला. कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेतील अनेक शहरांत  शुक्रवारपासून हिंसक निदर्शने होत आहेत. यापैकी काही निदर्शनांनी आक्रमक रूप धारण केले आहे. तसेच पोलिसांसोबतही निदर्शकांची बाचाबाची झाल्याची माहिती आहे.

ट्रम्प यांनी डाव्यांना धरले जबाबदार -
अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध शहरात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांसाठी डाव्यांना जबाबदार धरले आहे. यामुळे निर्दोष लोक भयभीत झाले आहेत. निदर्शक उद्योग धंद्यांचेही नुकसान करत आहेत. इमारती जाळत आहेत, असे ट्रम्प म्हणाले. 

बनावट नोट चालविण्याचा प्रयत्न
जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाने २० डॉलरची एक बनावट नोट एका दुकानात चालविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. जॉर्जला त्याच्या कारमधून उतरायला सांगितल्यानंतर त्याने पोलिसांशी हुज्जत घातली व झटापटही केली, असे पोलिसांनी सांगितले. त्यावेळी रस्त्यावरून जाणाºयांपैकी कोणीतरी या घटनेचे मोबाईल फोनमधून चित्रीकरण केले.

Web Title: President donald trump rushed to underground bunker in white house during protest on George Floyd murder case sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.