अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याचे अध्यक्ष ट्रम्प यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 06:43 AM2019-02-03T06:43:17+5:302019-02-03T06:43:54+5:30

अमेरिकेत अवैधरीत्या घुसणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी देशाच्या दक्षिण मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी आपण लवकरच राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याच्या जवळ पोहोचलो आहोत, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

President Donald Trump signs of the National Emergency in the United States | अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याचे अध्यक्ष ट्रम्प यांचे संकेत

अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याचे अध्यक्ष ट्रम्प यांचे संकेत

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेत अवैधरीत्या घुसणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी देशाच्या दक्षिण मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी आपण लवकरच राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याच्या जवळ पोहोचलो आहोत, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यानंतर काँग्रेसच्या मंजुरीशिवाय भिंत उभारण्याच्या दिशेने ट्रम्प पावले उचलू शकतील. आपत्कालीन निधी दक्षिण मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी खर्च करण्याचे अधिकार त्यांना मिळतील.

ट्रम्प यांनी सांगितले की, सीमा सुरक्षेवर विरोधक डेमोक्रॅटिकसोबत चर्चा म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. अमेरिकी प्रतिनिधी सभेच्या अध्यक्षा नैंसी पेलोसी यांच्यावर त्यांनी आडमुठी भूमिका घेतल्याचा आरोपही केला. (वृत्तसंस्था)

Web Title: President Donald Trump signs of the National Emergency in the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.