जो बायडन सायकलवरुन पडले, पॅडलमध्ये अडकला पाय; डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 10:24 AM2022-06-19T10:24:15+5:302022-06-19T10:25:26+5:30

Joe Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आपल्या पत्नीसोबत सुट्टी घालवण्यासाठी डेलावेअरमध्ये आले होते. यावेळी सायकलवरुन जात असताना ते पडले.

President of America Joe Biden fell off the bicycle, feet stuck in the paddle; Video shared by Donald Trump's son | जो बायडन सायकलवरुन पडले, पॅडलमध्ये अडकला पाय; डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने शेअर केला व्हिडिओ

जो बायडन सायकलवरुन पडले, पॅडलमध्ये अडकला पाय; डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने शेअर केला व्हिडिओ

Next

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) सायकलवरुन पडल्याची घटना घडली आहे. अमेरिकेतील डेलावेअर राज्यात सायकल चालवत असताना बायडन यांचा पाय पॅडमध्ये अडकून ते पडले. सुदवैना या अपघातात त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. बायडन सायकलवरुन पडताच त्यांचा स्टाफ त्यांना उचलण्यासाठी आला. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने हा व्हिडिओ ट्विट केला आहे:-

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी(18 जून), जो बायडन आपली पत्नी जिल बायडनसोबत डेलावअर राज्यातील रेहोबोथ बीचवर वीकेंड एन्जॉय करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी इतरांसोबत सायकल चालवण्याचा आनंद लुटला. त्यांना पाहण्यासाठी त्यांचे अनेक समर्थक रेहोबोथ बीच येथील केप हेन्लोपेन स्टेट पार्कमध्ये पोहोचले होते. 

सुरक्षा रक्षकांनी घातला घेराव 
सायकल चालवताना बायडन यांचा पाय पेडलमध्ये अडकला आणि ते अडखळून पडले. बायडन यांनी सायकल चालवताना टी-शर्ट, शॉट्स आणि हेल्मेट घातले होते. ते सायकलवरुन पडताच त्यांच्यावर पहारा देणाऱ्या रक्षकांनी त्यांना घेराव घातला आणि उचलण्यास मदत केली. दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने बायडन यांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Web Title: President of America Joe Biden fell off the bicycle, feet stuck in the paddle; Video shared by Donald Trump's son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.