उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष कारिमोव्ह यांचे निधन
By Admin | Published: September 3, 2016 05:43 AM2016-09-03T05:43:45+5:302016-09-03T06:36:29+5:30
उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इस्लाम कारिमोव्ह यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. कारिमोव्ह हे गेल्या २७ वर्षांपासून उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी कार्यरत होते.
>
ऑनलाइन लोकमत
ताश्कंद, दि, २ - उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इस्लाम कारिमोव्ह यांचे शुक्रवारी स्ट्रोकमुळे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
इस्लाम कारीमोव्ह यांना गेल्या काही दिवसांपासून ब्रेन स्ट्रोकमुळे येथील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र, अखेर शुक्रवारी त्यांचे निधन झाले.
इस्लाम कारीमोव्ह यांची मुलगी लोला तिल्लीईवा हिने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांच्यावर शनिवारी समरकंद येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
कारिमोव्ह हे गेल्या २७ वर्षांपासून उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी कार्यरत होते. सोव्हिएत रशियामधून बाहेर पडण्यासाठी झालेल्या स्वातंत्र्य चळवळीच्या नेतृत्वाची जबाबदारीदेखील कारिमोव्ह यांनी घेतली होती. ते एक हुकुमशहा म्हणून प्रसिद्ध होते.