अफगाणिस्तानात दोघांचा राष्ट्राध्यक्षपदाचा शपथविधी; तालिबानसोबतच्या शांतता वाटाघाटी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 01:43 AM2020-03-10T01:43:10+5:302020-03-10T06:58:21+5:30

दोघांच्या शपथविधीदरम्यान काबूलमध्ये दोन स्फोट झाले. यावरून अफगाणिस्तानमधील सुरक्षा स्थिती अत्यंत खराब असल्याचे अधोरेखित होते

President's oath of office in Afghanistan; Peace talks with Taliban in crisis | अफगाणिस्तानात दोघांचा राष्ट्राध्यक्षपदाचा शपथविधी; तालिबानसोबतच्या शांतता वाटाघाटी संकटात

अफगाणिस्तानात दोघांचा राष्ट्राध्यक्षपदाचा शपथविधी; तालिबानसोबतच्या शांतता वाटाघाटी संकटात

Next

काबूल : अफगाणिस्तानमधील प्रतिस्पर्धी नेते अशरफ गनी आणि अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी वेगवेगळ्या समारंभात राष्टÑाध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यामुळे राजकीय पेच निर्माण झाला असून, तालिबानसोबतची अमेरिकेची शांतता वाटाघाटी करण्याची योजनाही संकटात आली आहे.

अशरफ गनी आणि अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी आपापसांतील मतभेद मिटविले नाहीत. गनी यांना मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी घोषित करण्यात आले होते. मतदानात गैरप्रकार केल्याचा आरोप अब्दुल्ला यांनी केला होता.
निवडणूक आयोगाने याला दुजोरा दिल्याने दोघांनी स्वत:ला विजयी घोषित केले.

काबूलमध्ये दोन स्फोट
दोघांच्या शपथविधीदरम्यान काबूलमध्ये दोन स्फोट झाले. यावरून अफगाणिस्तानमधील सुरक्षा स्थिती अत्यंत खराब असल्याचे अधोरेखित होते. बैरूतहून आलेल्या वृत्तानुसार इस्लामिक स्टेट ग्रुपने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Web Title: President's oath of office in Afghanistan; Peace talks with Taliban in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.